tribkeshwar band.jpg 
नाशिक

#COVID-19 : त्र्यंबकेश्‍वरला शुकशुकाट..धार्मिक कार्य बंद! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ त्र्यंबकेश्‍वर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधामुळे त्र्यंबकनगरीत सर्वत्र शुकशुकाट आहे. गुरुवारी (ता. 19) एकादशीची वारी असली तरी निवृत्तिनाथांचे समाधी मंदिर दर्शनास बंद असल्याने वारी भरणार नाही, असे विश्‍वस्थ मंडळाने जाहीर केले आहे. 

लग्नाच्या वऱ्हाडींनाही कोरोनाचा धसका
कुशावर्तावर स्नानासही मज्जाव असल्याने तेथे बॅरिकेडिंग लावले आहे. सर्वत्र प्रशासनाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात गर्दी नसल्याने व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले आहे. लग्नाच्या वऱ्हाडींनीही कोरोनाचा धसका घेतल्याचे वातावरण आहे. अगदी मोजक्‍या लोकांनाच घेऊन कार्य केले जात आहे. पुरोहितांनी व्यवसाय बंद केले. त्र्यंबकेश्‍वर विविध धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे; परंतु कोरोनाच्या धसक्‍याने प्रशासनाच्या निर्णयानुसार बुधवार (ता. 18)पासून धार्मिक कार्य पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना परत पाठविण्यात आले आहे. पूजेच्या बुकिंग बंद करण्यात आल्याचे पुरोहित संघातर्फे जाहीर करण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT