nashik nmc bjp.jpg
nashik nmc bjp.jpg 
नाशिक

स्थायी सभापतिपदाचा निकाल लांबला.. भाजपची धाकधूक वाढली! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठीच्या निवडणुकीचा बंद पाकिटातील निकाल बुधवारी (ता.11) शिवसेनेने तौलनिक संख्याबळानुसार सदस्य नियुक्त करण्याच्या दाखल दाव्यानंतर लांबविला आहे. आता 19 मार्चला त्यावर सुनावणी होऊन स्थायी सभापतिपदाचा फैसला होणार आहे. न्यायालयाने शिवसेनेच्या दाव्याची दखल घेतल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

19 मार्चला सुनावणी; याचिकेने शिवसेनेच्या आशा पल्लवित, भाजपची धाकधूक वाढली 
महापालिका सभागृहात भाजपचे संख्याबळ घटल्याने स्थायी समितीवरील तौलनिक संख्याबळही घटले आहे. त्यानुसार शिवसेनेचा अतिरिक्त एक सदस्य नियुक्तीची मागणी गटनेते विलास शिंदे यांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करत महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेत स्थायी सदस्यांची घोषणा केली. नगरसचिव विभागाने सदस्य नियुक्तीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर 3 मार्चला सभापतिपदाची निवडणूक जाहीर केल्यानंतर शिंदे यांनी शासनाकडे तक्रार केली. शासनाच्या नगरविकास विभागाने दखल घेत निवडणूकप्रक्रिया थांबविण्याचे आदेशित करताना महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांकडून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची सूचना दिली. निवडप्रक्रियेला स्थगिती दिल्याविरोधात भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठविताना 6 मार्चला गुप्त मतदान घेऊन बंद पाकिटात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सभापतिपदासाठी एकमेव भाजपचे गणेश गिते यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक घेण्यात आली.

भाजपच्या गोटात धाकधूक वाढली 

निवडणुकीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावर बुधवारी (ता. 11) सुनावणी झाली. त्यापूर्वी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त व विभागीय आयुक्तांच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात शिवसेनेचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली. शिवसेनेकडून ऍड. अंतुरकर यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली. तर भाजपकडून निवडणूक झाल्याने सभापतिपदाची निवड घोषित करण्याची मागणी केली. मात्र शिवसेनेची बाजू ग्राह्य धरत न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी 19 मार्चला सुनावणी घेण्याचे आदेश देताना सभापती निवडणुकीचा निकाल घोषित करण्यास स्थगिती दिल्याने भाजपच्या गोटात धाकधूक वाढली आहे. 

शिवसेनेने चिटकवली नोटीस 
दरम्यान, बुधवारी निकाल जाहीर होऊन स्थायी समितीची सत्ता भाजपच्या ताब्यात येणार असल्याचा आनंद व्यक्त होत असतानाच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेची नोटीस भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्या दालनावर चिटकाविल्याने भाजपच्या आनंदावर विरजण पडले. या माध्यमातून शिवसेनेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT