Maharashtra SSC 2023 online result
Maharashtra SSC 2023 online result esakal
नाशिक

Maharashtra SSC Result 2023 : राज्यात दहावीचा निकाल आज दुपारी 1ला; या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती मिळणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. (results of 10th class examination will be declared online on 2 june at 1 pm nashik news)

सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल. पुणे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

दहावीचा निकाल उपलब्ध होणारे संकेतस्थळ असे :

  • www.mahresult.nic.in,

  • http://sscresult.mkcl.org.in,

  • https://hindi.news18.com/news/career/board-resultd-maharashtra-boars,

  • https://www.indiatoday.in/eduction-today/maharashtra-board-class-10th-result-2023,

  • http://mh10.abpmajha.com.

तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन निकालानंतर दहावीच्या स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन स्वतः अथवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय असेल. त्यासाठी अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

गुणपडताळणीसाठी ३ जून ते १२ जूनपर्यंत, छायाप्रतीसाठी ३ ते २२ जूनपर्यंत अर्ज ऑनलाइन करता येतील. त्यासोबत शुल्क ऑनलाइन पद्धतीने डेबीट कार्ड अथवा क्रेडीट कर्ज अथवा युपीआय अथवा नेट बँकींगने भरता येईल. उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत आवश्‍यक आहे.

श्रेणी अथवा गुणसुधार साठी मार्च २०२३ मधील उत्तीर्ण होणाऱ्या होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४ या दोन संधी उपलब्ध असतील. पुरवणी परीक्षेसाठी व श्रेणीसुधारसाठी ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ जूनला दुपारी तीननंतर शाळेत मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT