theater
theater esakal
नाशिक

राज्य नाट्य स्पर्धा | ‘हा वास कुठून येतोय..?'ने मारली नाशिक केंद्रावर बाजी

तुषार महाले

नाशिक : ६०व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्टस, नाशिक या संस्थेच्या ‘हा वास कुठून येतोय ...?’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, संवर्धन बहुउद्देशीय संस्था, नाशिक या संस्थेच्या ‘आला रे राजा’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

प्राथमिक फेरीचे अन्य निकाल

नाटयसेवा थिएटर, नाशिक या संस्थेच्या ‘बाई जरा कळ काढा’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक सचिन शिंदे (हा वास कुठून येतोय...?), द्वितीय पारितोषिक रोहित पगारे (आला रे राजा)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक प्रफुल्ल दिक्षीत (हा वास कुठून येतोय ...?), द्वितीय पारितोषिक रवी रहाणे (आला रे राजा)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक निलेश राजगुरु (आला रे राजा), द्वितीय पारितोषिक लक्ष्मण कोकणे (हा वास कुठून येतोय ...?)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक ललित कुलकर्णी (द लॉर्ड अॅण्ड द किंग), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (हा वास कुठून येतोय ...?)

उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक - दिलीप काळे (आला रे राजा) व पुजा पुरकर (बाई जरा कळ काढा)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : क्षमा देशपांडे (हा वास कुठून येतोय...?), सई मोने (फायनल ड्राफ्ट), प्राजक्ता गोडसे (द लॉर्ड अॅण्ड द किंग), रसिका देशपांडे (स्वातंत्र्याच्या सावल्या), सुमन शर्मा (क्रकच बंध), धनंजय गोसावी (हा वास कुठून येतोय..?), निलेश सुर्यवंशी (हा वास कुठून येतोय..?), आशिष चंद्रचुड (द लॉर्ड अॅण्ड द किंग), शुभम साळवे (आज बस इतकंच पुरे), राहुल मंगळे (कात).

२१ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत परशुराम साईखेडकर नाटयगृह, नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मधु जाधव, गुरु वठारे आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT