Geranium Field
Geranium Field esakal
नाशिक

Nashik : सेवानिवृत्त सैनिकाचे सुगंधी जिरेनियम शेतीतून लाखोंचे उत्पन्न

संतोष घोडेराव

अंदरसूल (जि. नाशिक) : दुष्काळावर मात करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर नक्कीच यशाला गवसणी घालता येते हे दाखवून दिले आहे अंदरसुल व वडगाव येथील दोन तरुण शेतकारी मित्रांनी. पारंपरिक शेतीला फाटा देत अंदरसूलचे निवृत्तसैनिक (Retried Soldier) अनिल रामभाऊ धनगे व वडगाव येथील प्रगतशील शेतकरी किरण अशोक पवार यांनी कॉसस्मेटिक (Cosmetics) प्रसाधनेसाठी लागणाऱ्या सुगंधी जिरेनियम (fragrant geranium) शेतीचा मार्ग निवडला. आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने पाच एकर क्षेत्रात जिरेनियम शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवित सुगंधी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. (Retired soldier earns millions from fragrant geranium farming Nashik News)

सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिक अनिल धनगे यांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्नाचा मार्ग शोधून धनगे आपल्या कुटुंबाचे आधारवड बनले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना सर्व कुटुंबाची खंबीर साथ यासाठी मिळाली आहे. प्रगतशील शेतकरी किरण पवार यांच्या खंबीर साथीने धनगे यांनी पाच एकरावर स्वतःच जिरेनियम रोपाची निर्मिती करून तयार केलेल्या जिरेनियमच्या रोपांची लागवड गादी वाफ्यावर करीत येवला तालुक्यात प्रथमच सुगंधी शेतीला सुरुवात केली. सर्वत्र भीषण पाणी टंचाईबरोबर दुष्काळाची दाहकता व वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी धनगे यांनी जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला. या सुगंधी शेतीला लागणारे तापमान नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण शेती क्षेत्राला ठिबक सिंचनचा वापर केला. जिरेनियम शेतीसाठी लागणारे रोप, ठिबक सिंचन व इतर खर्च मिळून एकूण पाच एकरासाठी एकूण साडे तीन ते चार लाखाच्या जवळपास खर्च या तरुण शेतकरी मित्रांना आला आहे.

पाल्यापासून तेलनिर्मिती

या मित्रांना संपूर्ण झाडाची नियमितपणे काळजी घेत प्रत्येक झाडाला ठिबकद्वारे पाण्याचा व औषध वापर करीत जिरेनियमची सुगंधी शेती चांगलीच बहरली आहे. यातून तयार होणाऱ्या सुगंधी तेलाला बाजारात चांगलीच मागणी वाढली आहे. एक एकराला वर्षातून चार वेळा झाडाचा पाला तोडणी केली जाते. एक टन पाल्यात एक किलो तेलाची निर्मिती होते, या तेलाला किलोला बारा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.

एकदा लागवड केलेली जिरेनियम सुगंधी शेती सलग तीन वर्ष चालत असल्याने खर्च वजा जाता वर्षाकाठी २४ ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे धनगे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे जिरेनियम सुगंधी तेलाची निर्मितीसाठी धनगे यांनी आपल्याच शेती क्षेत्रात पाच लाख रुपये खर्च करून तेल निर्मितीसाठी स्वतंत्र प्लॉंटची निर्मिती केली असल्याने या शेतकरी मित्रांच्या बहरलेल्या जिरेनियम सुगंधी शेतीला व प्लॉंटला परिसरातील शेतकरी भेट देऊन नवीन प्रयोगाची माहिती आणि मार्गदर्शन घेत आहेत.

"परिस्थितीवर मात करण्यासाठी पारंपरिक शेतीला फाटा देत जिरेनियम सुगंधी शेती करण्याचा निर्णय सहकारी मित्राच्या मदतीने घेतला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून यशस्वी करण्याचे उदिष्ट आहे." - अनिल धनगे, जिरेनियम सुगंधी शेती उत्पादक शेतकरी, अंदरसूल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT