Retired teachers can register as voters in Teachers Constituency Election nashik news sakal
नाशिक

Teacher Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत निवृत्त शिक्षकांचा वाढणार ‘भाव’

हर्षवर्धन बोऱ्हाडे

Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आठ महिन्यांनी होणार असली तरी मतदार नोंदणीकडे इच्छुक उमेदवार सध्या नजर ठेवून आहेत.

१ नोव्हेंबर २०२३ च्या अगोदर सहा वर्षांत तीन वर्षे अध्यापनाचे काम केलेले असल्यास निवृत्त शिक्षकांना मतदार नोंदणी करता येईल. म्हणून १ नोव्हेंबर २०२३ च्या आधी तीन वर्षे निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार नोंदणी करता येणार असल्याने सध्या इच्छुक कामाला लागले आहेत. (Retired teachers can register as voters in Teachers Constituency Election nashik news)

नाशिक- धुळे- जळगाव- नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत आणि ५४ तालुक्यांत शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे. जर शिक्षक लगतच्या सहा वर्षांत निवृत्त झाले असतील; परंतु त्यांचा लगतच्या सहा वर्षांपैकी तीन वर्षांचा अध्यापनाचा काळ पूर्ण झालेला असेल, असे निवृत्त शिक्षकही मतदार नोंदणीस पात्र राहू शकतात. यामुळे अनेक इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

निवृत्त शिक्षकांची मतदार नोंदणी करून घेण्यात सध्या इच्छुकांनी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शाळेत अध्यापन करणारे शिक्षक मतदार नोंदणी करणारच आहेत. निवृत्त झालेल्या शिक्षकांची शोधाशोध सध्या इच्छुक उमेदवार घेत असल्याने या मतदारसंघात येणाऱ्या काळात मतदार कसा नोंदविला जातो, यावर शिक्षक मतदारसंघाच्या विजयाचे गणित अवलंबून असेल.

प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात मतदार नोंदणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून, एकगठ्ठा पॉकेट व्होट नोंदविण्याकडे इच्छुकांचा कल आहे.

"सहा वर्षांपैकी तीन वर्षे अध्यापन झालेले असल्यास शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. यात सलग अध्यापन केलेले नसेल तरी चालेल. मात्र, तीन वर्षे अध्यापन असायला हवे. यासाठी शासनाने पाचही जिल्ह्यांत यंत्रणा कार्यान्वित केली आहे." - रमेश काळे, उपायुक्त, महसूल तथा निवडणूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT