Chhagan Bhujbal esakal
नाशिक

पालकमंत्र्यांचा आढावा की झाडाझडती?

पालकमंत्री छगन भुजबळ सोमवारी (ता. ३०) थेट जिल्हा परिषद मुख्यालयात धडक देणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली असून, या राजवटीत लोकप्रतिनिधींना हस्तक्षेप करता येत नसल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वारू उधळला आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्याच्या आविर्भावात अधिकारी असल्याने त्याला वेसण घालण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सोमवारी (ता. ३०) थेट जिल्हा परिषद मुख्यालयात धडक देणार आहेत. त्यामुळे भुजबळ यांचा दौरा विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आहे की झाडाझडतीसाठी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिक महापालिकेच्या कामकाजासंदर्भात तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी पंधरा दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात बैठक घेत विविध कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरच प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. आयुक्तांसह बांधकाम, नगररचना, प्रशासन उपायुक्त, अतिक्रमण आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची गाळण उडाली. त्यानंतर पालिकेच्या कामकाजात सुधारणा होऊन एका दिशेने काम होण्याबरोबरच महापालिकेवर सरकारचा वचक असल्याचा संदेश गेला. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कामांचाही लेखाजोखा घ्यावा, अशी मागणी होती. त्यानुसार येत्या सोमवारी (ता. ३०) जिल्हा परिषद मुख्यालयात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुजबळ यांनी सकाळी अकराला बैठक बोलविली आहे.

बदल्या, निधीवाटपावर चर्चा

विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी प्रशासकीय राजवटीतील एककल्ली कारभारातून निर्माण झालेल्या समस्यांच्या अनुषंगाने पालकमंत्री भुजबळ झाडाझडती घेणार असल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय बदल्या तसेच निधीवाटपातील अनियमितता सदस्य निधी वाटपातील त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या सदस्यांनी सुचविल्यानंतरही मंजूर झालेली कामे आदींचा लेखाजोखा पालकमंत्र्यांसमोर मांडला जाणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी विसंवाद असलेल्या सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य तसेच नाराज कर्मचाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या यानिमित्ताने फुटल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT