Rickshaw driver Muffujar Mansuri handing over the market bag bought by Anusaya Vaishnav  esakal
नाशिक

Positive News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात राहिलेला बाजार केला घरपोच

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव शहरात रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाची गुजरान करणारा रिक्षाचालक मफ्फूजर मन्सूरी याने आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला आहे. (rickshaw driver returned belongings of woman nashik news)

वर्धमान हायस्कूलच्या शिक्षिका अनुसया वैष्णव अक्षयतृतीयेच्या सणाचा बाजार तसेच कपडे खरेदी करून घराकडे मन्सूरी यांच्या रिक्षातून परतत असताना मिठाई घेण्यासाठी त्यांनी रिक्षा थांबविली. अक्षयतृतीया व रमजान ईद या सणामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे प्रवासी व रिक्षाचालक यांची चुकामुक झाली.

त्यानंतर रिक्षाचालक इतर प्रवासी घेऊन निघून गेला. काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की रिक्षात बसलेल्या महिलेची बाजाराची पिशवी रिक्षातच राहिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रिक्षा चालकांनी तत्काळ स्वीटमार्ट गाठले. मिठाई खरेदी घेणाऱ्या महिलेविषयी चौकशी केली असता त्याला त्यांचे नाव समजले.

नावावरून चौकशी करत असतानाच शिक्षक समिती मालेगाव शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांची योगायोगाने रिक्षाचालक यांच्याशी भेट झाली.‌ त्यांनी अनुसया वैष्णव यांचे घर शोधण्यास मन्सूरी यांना मदत केली. ज्ञानेश्वर नगर परिसरातील शिक्षिकेचे घर शोधून मफ्फूजर मन्सूरी या रिक्षा चालकाने अक्षय तृतीयेचा बाजार श्रीमती. वैष्णव यांना घरपोच दिला. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा व धडपड पाहून शिक्षिकाही भावूक झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT