Rigorous imprisonment for accused in case of accidental death nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News: अपघाती मृत्युप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: मद्याच्या नशेमध्ये भरधाव वेगात कार चालवून रस्त्यालगत ॲक्टिवाजवळ उभ्या असलेल्या तिघींना धडक देऊन चालक पसार झाला. या अपघातात एकीचा मृत्यु तर, दोघी गंभीररित्या जखमी झाल्या होत्या.

याप्रकरणात न्यायालयाने अपघातात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी कारचालकास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (Rigorous imprisonment for accused in case of accidental death nashik crime news)

निशिकेत राजेंद्र पवार (२७, रा. निर्मल्यम्‌ अपार्टमेंट, गंगापूर रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोमेश्वर मंदिराच्या मेन गेटजवळ अपघात झाला होता.

त्यावेळी आरोपी पवार हा मद्याच्या नशेमध्ये भरधाव वेगातील कार (एमएच १५ जीएफ ९५०२) जेहान सर्कलकडून गंगापूर गावाच्या दिशेने जात असताना त्याने रस्त्यालगत ॲक्टिवाजवळ (एमएच १५ एफएस ४११७) थांबलेल्या पल्लवी, स्नेहल व वैष्णवी यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर तो पसार झाला होता.

या अपघातामध्ये वैष्णवी चौधरी हिचा मृत्यु झाला तर दोघी जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अपघातासह मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक नितीन पवार यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर.आर. खान यांच्यासमोर खटला चालला.

सरकारी पक्षातर्फे सहायक अभियोक्ता एस.आर. सपकाळे यांनी कामकाज पाहिले. सबळ पुरावे आणि साक्ष यामुळे न्या. खान यांनी आरोपी पवार यास दोन वर्षे सश्रम कारावास आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार व्ही. पाटील यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT