Nashik News : सिन्नर शहराजवळील माळेगाव व मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी सात किलोमीटरचा रिंगरोड अर्थात बाह्यवळण रस्ता उभारण्यात येणार आहे.
एमआयडीसीने या रस्त्यासाठी आवश्यक ५१ हेक्टरच्या भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (ring road will be constructed from Malegaon to Musalgaon nashik news)
या बाह्यवळण रस्त्यामुळे सिन्नर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तर सुटेलच याशिवाय शहराच्या विकासाला चालनाही मिळणार आहे. माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहतींसह ‘सेझ’प्रकल्पामुळे सिन्नरच्या विकासाला गती मिळाली. नवीन उद्योगांमुळे रोजगार वाढला तसा शहराचा विस्तारही झाला.
शहरातून जाणाऱ्या हायवेमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुर्हेवारी ते शिर्डीरोडपर्यंत बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. पण शहराच्या उत्तर बाजूने येणाऱ्या नागरिकांना मुख्य शहरातूनच पारंपारिक रोडने प्रवास करावा लागतो. परिणामी, शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. यावर हा रिंगरोड उपायकारक ठरणार आहे.
नाशिक-पुणे रोडला हा रस्ता जोडला जाणार असल्याने उत्तर भागातील लोकांना शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. राज्य सरकारने ‘सेझ’ प्रकल्पाची जमीनही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत उभी राहू शकते. त्यादृष्टीने या बाह्यवळण रस्त्याची सिन्नरकरांना नितांत आवश्यकता होती.
यासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव आल्यानंतर सात किलोमीटर रस्त्यासाठी प्रथमत: भूसंपादनाची नोटीस जारी केली. त्यानुसार ३१ हेक्टर जमिनीची आवश्यकता लागेल. साधारणत: ४५ मीटर भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल.
शहरातील दुसरा रिंगरोड
सिन्नर शहराच्या बाजूने होणारा हा दुसरा रिंगरोड ठरणार आहे. यापूर्वी सिन्नर ते गुर्हेवाडी पर्यंत आणि गुर्हेवाडीपासून शिर्डी रोडला हा रस्ता जोडण्यात आला. आता माळेगाव ते मुसळगाव हा रिंगरोड तयार होणार असल्याने शहराच्या उत्तर दिशेने येणाऱ्या नागरिकांना पारंपारिक रोडने सिन्नर शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शहराचा विकासही होईल.
''रिंगरोड उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध झाली असून, यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.''-जे. सी. बोरसे, कार्यकारी अभियंता (एमआयडीसी, नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.