vada-pav.jpg 
नाशिक

गरीबांना वडापावही परवडेना; तेल, बेसनाचे दर कडाडल्याने खाद्यपदार्थ महागले

नीलेश छाजेड

एकलहरे (नाशिक) : कोरोना काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना तेलाच्या व बेसनाच्या वाढत्या किमतीने हातावरचा मजूर वडापाव खाऊन एकवेळची गुजराण करायचा, त्याचेही दर वाढले आहेत. दिवाळीनंतर बाजारात मंदीचे वातावरण असतानाही तेलाच्या बाजारभावात तेजी उसळली. ती नवीन वर्षातही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाचे बाजारभाव चढे असल्याने हा परिणाम असून, अजून दोन महिने दरात कमी येण्याची शक्यता कमी आहे. 

हातगाडीवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरात वाढ

हरभऱ्याचे पीक मार्च -एप्रिलदरम्यान येते. त्यामुळे चणाडाळीचा दरही वाढताच असल्याने याचा परिणाम बेसनावर झाला असून, बेसनाचे दर नव्वदी ओलांडू पाहात आहे. त्यामुळे हॉटेल व हातगाडीवर मिळणारे खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे. ११-१२ रुपयांत विकला जाणारा वडापाव, पाववडा १५ रुपये, मिसळ ५० वरून ७० रुपये झाली आहे. भजी १८ रुपयांवरून २५ रुपये, सँडविच १२ चे १६ रुपये, अशी दरात वाढ झाली आहे. तेलाच्या दरात दिवाळीनंतर साधारण २० ते ३० टक्के दरवाढ झाली आहे. तर बेसनाच्या दरात दहा ते १५ टक्के दरवाढ झाली असल्याने खाद्यपदार्थांच्या दरात वाढ ही अटळ होती. परंतु या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत असताना सरकारने या दरवाढीला अंकुश लावावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. 

तेल - नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ 

सोयाबिन - ९०-९५ - १२०-१३० 
सूर्यफूल - १००-१०५ - १३०-१४० 
शेंगदाणा - १३५-१४० - १६०-१६५ 
तेल १५ लिटरप्रमाणे सोयाबिन तेलामागे सहाशे, तर सूर्यफूल सहाशे ते साडेसहाशे, अशी घसघशीत वाढ झाली आहे. 

भारतात कच्च्या मालाचा तुटवडा असून, परदेशातून जेथून तेलाची आयात होते त्या देशात कामगारांचा संप सुरू असल्याने तेलाच्या दरात कधी नाही ती एवढी वाढ झाली आहे. - राजेश बोथरा, किराणा व्यावसायिक 

तेलाच्या व बेसनाच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने खाद्यपदार्थांच्या किमती वाढविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. - पिंटू गोसावी, हॉटेल व्यावसायिक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT