Potholes on service road latest rain news
Potholes on service road latest rain news esakal
नाशिक

Nashik : संततधारेने शहरात रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Constant Rain) शहरातील बहुतांशी रस्ते (Road damaged) उखडले असून, रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेचा वाहतुकीवर परिणाम होतो आहे. जागोजागी खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

तर, मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आलेले आहे. (Roads flooded in city with constant rain stream Increase in accidents due to potholes Nashik Latest Rain Marathi News)

संततधार पावसामुळे ओढे- नाल्याप्रमाणेच रस्तेही वाहून निघाले आहेत. मात्र, या संततधारेमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते.

त्यामुळे वाहनचालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज वाहन चालविताना येत नाही. परिणामी खड्ड्यात वाहने जाऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. संभाजी चौकाकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संभाजी चौक, सीटी सेंटर मॉल सिग्नल, उंटवाडी चौक, दत्तमंदिर चौक या ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

तसेच, त्र्यंबक रोडवरील सिबल चौकातून बॉईज टाऊन शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. तर, जुन्या पोलिस आयुक्तालयाकडून बॉईज टाऊन शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावर तर अतिशय धोकादायक असे खड्डे तयार झाले आहेत.

चारचाकी वाहनचालकालाही वाहन चालविताना कसरत करावी लागते. तर, दुचाकीस्वारांसाठी धोकादायक झाले आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. अशी अवस्था शहरातील उपनगरी रस्त्यांची झाली आहे.

वाहतूक कोंडी नित्याचीच

संततधार पावसामुळे द्वारका सिग्नल, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, सीबीएस चौक, मेहेर सिग्नल, एमजी रोड, रविवार कारंजा, गंजमाळ सिग्नल या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. एमजी रोडवर बेशिस्त वाहनांची पार्किंग केली जाते.

तर, वाहतूक शाखेकडून दुचाकींची टोइंग केली जाते. परंतु, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तशीच स्थिती सीबीएस चौक ते अशोक स्तंभ स्मार्ट रोडवर असते.

सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांची पार्किंगचीच रांग लागलेली असते. याच रांगेलगत अनधिकृतरीत्या चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतुकीला रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

सीबीएस खड्डेमय

मध्यवर्ती जुन्या सीबीएस बसस्थानकात पावसामुळे अक्षरश: खड्ड्यांची चाळण झाली आहे. बसस्थानक आवारातून बस चालविणे चालकांना या खड्ड्यांमुळे जिकिरीचे झाले आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Alert: तुमच्या फोनमधील प्री-इंस्टॉल असलेले ॲप्स वेळीच करा डिलीट,अन्यथा ...

SCROLL FOR NEXT