smart city nashik google
नाशिक

नाशिक शहरात पुढचे तीन महिने आता ‘नो पार्किंग’

विनोद बेदरकर

लॉकडाउनला लोक वैतागले असून, सगळ्यांना जून उजाडण्याची आशा आहे. जूनपासून अनलॉक सुरू झाल्यानंतर उद्योग व्यवसाय सुरू होतील, अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे.

नाशिक : लॉकडाउनला (Lockdown) लोक वैतागले असून, सगळ्यांना जून उजाडण्याची आशा आहे. जूनपासून अनलॉक सुरू झाल्यानंतर उद्योग व्यवसाय सुरू होतील, अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे. नेमक्या याच काळात नाशिक शहरात स्मार्टसिटीच्या (Nashik Smart City) कामांमुळे किमान तीन महिने महत्त्वाचे रस्ते लॉक होणार आहे. आधी लॉकडाउनमुळे त्रस्त नागरिकांना आता रस्त्याच्या खोदकामामुळे नशिबी वैतागच येणार आहे. (roads in Nashik city will be locked for at least three months due to smart city works)

शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते गटारीच्या कामासाठी खोदून ठेवले आहेत. त्यामुळे सीबीएस, रविवार कारंजा, अशोक स्तंभ अशा मध्यवर्ती व कायम वर्दळीच्या भागात लोकांना नो पार्किंगच्या कटकटीचा तब्बल तीन ते चार महिने सामना करावा लागणार आहे. काट्या मारुती ते लक्ष्मीनारायण रस्त्याच्या कडेला काम सुरू होणार असल्याने रोड दुभाजकाच्या दोन्ही बाजूस वाहनांसाठी ‘नो पार्किंग’ झोन घोषित करण्यात आला आहे. १८० दिवसांकरिता हा निर्णय लागू राहणार आहे. असाच ‘नो पार्किंग’ आदेश विकासभवन (सीबीएस) ते शिवाजी गार्डन (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा) या रस्त्यासाठी लागू राहणार आहे. येथे भूमिगत विद्युतवाहिका, मलवाहिका टाकण्याचे काम सुरू आहे. हा निर्णय ६० दिवसांसाठी लागू राहणार आहे. र

विवार कारंजा ते एमजी रोड चौक (सांगली बँक सिग्नल) या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. यापुढे ती तशीच चालू राहणार असून, पुढील ७५ दिवस मात्र रस्त्याच्या दोन्ही कडेला सर्व प्रकाराच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. अशोक स्तंभ ते नंदादीप अपार्टमेंटपर्यंत रस्त्यावरील एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, आता हा रस्ता नो पार्किंग झोन घोषित झाला असून, रस्त्याच्या कडेला पुढील ६० दिवसांमध्ये वाहने पार्क झाल्यास पोलिसांकडून कारवाई होऊ शकते. भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील नेहरू गार्डन चौक (नेपाळी कॉर्नर) ते नवापुरा चौक (गाडगे महाराज पुतळ्याकडील बाजू) येथेही नो पार्किंग झोन जाहीर केला आहे. या ठिकाणी दुहेरी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील तुळजाभवानी मंदिर ते गंगावाडी गार्डन या रस्त्यावर भूमिगत पाइपलाइनचे काम सुरू असून, पुढील ८० दिवसांकरिता येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन जाहीर केला आहे.

(roads in Nashik city will be locked for at least three months due to smart city works)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : नागपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT