crime esakal
नाशिक

मालेगावात लुटारूंकडून धक्कादायक प्रकार; पोलिसांवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात गुन्हेगारी कारवाया, चोरी, घरफोड्या, चैन स्नॅचिंग, लुटमार हे प्रकार वाढत असतानाच गुन्हेगार निर्ढावले आहेत. येथील यंत्रमाग कारखानदाराचे अपहरण करुन त्याला २८ हजार रुपयांना लुटणाऱ्या संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले नाहीत. शहरातील सरदारनगर भागात बुधवारी (ता. ९) रात्री हा प्रकार घडला.

पोलिसांवर रोखले गावठी पिस्तुल

दुचाकीवर जाणाऱ्या यंत्रमाग कारखानदार एजाज अहमद खुर्शीद अहमद (वय ५२, रा. नया इस्लामपुरा) यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून एटीएम केंद्रावर नेत जबरदस्तीने २५ हजार रुपये लुटल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास साठफुटी रोडजवळ घडला होता. या प्रकरणी आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात पोलिसांनी नदीम अहमद शकील अहमद (वय २२, रा. अबुबकर सिद्दीकीनगर) याला अटक केली. याच गुन्ह्यातील अन्य दोघे संशयित सरदार नगरात आल्याची माहिती पथकाला मिळाली. हवालदार गिरीश निकुंभ, पोलिस नाईक सुभाष चोपडा हे संशयितांना अटक करण्यासाठी सरदारनगरात गेले असता संशयित जमाल बिल्डर व सलमान (पूर्ण नाव माहित नाही) यांनी कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून पोलिसांवर गावठी पिस्तुल रोखले. जमालने हवेत दोन राऊंड फायर केले. यात पोलिसांनी पकडलेला एक संशयित फरार झाला.

पोलिसांवरील हल्ल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे पोलिस निरीक्षक पारीख यांनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत संशयितांचा सरदारनगर झोपडपट्टीत शोध घेतला. श्री. निकुंभ यांच्या तक्रारीवरुन आझादनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT