robbery in home.jpg 
नाशिक

वाह रे!...चोराची हिंमत घरात माणसे असूनही केला 'हा' प्रताप!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : चांदवड तालुक्‍यातील दरेगांव येथे रात्री साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यानला मनमाडकडे जाणाऱ्या दरेगांव चौफुलीच्या पुढे मळ्यात राहणारे छगन मल्हारी आहिरे यांच्या घरी घरात दोघेच नवरा-बायको आहेत याचा अंदाज घेत ते दमदाटी करून घरात घुसले अन् रोख रक्कम व दागिने असा एकूण पंच्यानो हजाराचा एवज चोरुन नेला. 

अशी घडली घटना

रात्री चोरट्यांनी मळ्यातील घराजवळील रोहित्र बंद करुन चोरी केली. छगन आहिरे व त्यांची पत्नी हिराबाई आहिरे नवरा बायको दोघेच घरी होते. मुलगा व सुन, नात, नातु हे चौघे जण सासुवाडीला पैशाच्या कामासाठी मांडवड येथे गेले होते. चोरट्यांना दोघेच पती- पत्नी घरी असल्याचा अंदाज आल्याने दरवाजाच्या सापटितुन हात घालुन कडी खोलुन घरात प्रवेश केला व कपाट तोडुन कपाटातुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा पंच्यानो हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. लोखंडी पेटी, मिरचीचे डब्बे, मिरची पावडर डब्बा कपडे घराच्या बाहेर आणुन सर्वच सामान फेकुन देण्यात आले. बाहेर कपडे, मिरच्या,मिरची पावडर रिकामी पेटी,डब्बे पडलेले आढळले.कपाटाची तोडफोड व सामानाची नासधूस करण्यात आली. छगन आहिरे यांना आवाज आल्याने उठले असता घरात चोरटे असल्याने जोरात ओरडुन उठले तेव्हा चोरट्यांनी तेथुन पळ काढला व अंधाराचा फायदा घेत ग्रामस्थ जमा होइपर्यंत पसार झाले.

पुढील तपास सुरु

चार ते पाच चोरटे असल्याचे आहिरे यांनी सांगितले. ग्रामस्थ जमा झाल्याने याबाबत ची माहिती चांदवड पोलिस स्टेशन देण्यात आली. रात्री चांदवड पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी येउन पंचनामा करून गेले. व सकाळी घटनास्थळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांचे सहका-यांनी भेट देउन पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT