taxi esakal
नाशिक

इगतपुरीत टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : शहरातील टॅक्सीचालकांकडून नाशिकला जाणाऱ्या व नाशिकहून इगतपुरीला येणाऱ्या प्रवाशांची प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारून मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी बसवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. या सर्व प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. (Robbery of passengers by taxi drivers in Igatpuri Nashik latest Marathi news)

इगतपुरी-नाशिकचे भाडे ७० रुपये असून, ओम्नी टॅक्सीत आठ प्रवासी बसवले जात होते. मात्र सणासुदीचा व सुट्यांचा फायदा घेत प्रवाशांकडून १०० रुपये भाडे आकारणी करून किमान आठ प्रवासी बसविण्याची सोय असताना रात्री १० ते ११ पेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात.

प्रवाशांनी टॅक्सी चालक-मालक संघाच्या अध्यक्षांकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. इगतपुरी पोलिसांचे लक्ष नसून टॅक्सीचालकांची मुजोरी वाढली आहे. अनेक वाहनचालकांकडे परमिट, बॅच, लायसन्स, वाहनाची कागदपत्रचे नाही. सर्व वाहनांची चौकशी करून पंधरा वर्षांपुढील वाहनांना बंदी करून प्रवासी संख्या, नियम व भाडे दर कायम करावा, अशी मागणी होत आहे.

"टॅक्सी स्टँडवर वाहने कमी असले, की भाडेवाढ करून जास्त प्रवासी वाहनात कोंबले जातात. रात्री दुप्पट भाडे, रुग्ण किंवा अपंग व्यक्तीला जास्त भाडे, विशेष म्हणजे महिलांना गर्दीत पुरुषांशेजारी बसताना लज्जास्पद वाटते, याबाबत पोलिसांनी लक्ष घालावे."

- कुसुम राठोड, प्रवासी

"शहर व परिसरातील प्रवाशांना नाशिकला रुग्णालयात किंवा खासगी कामासाठी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. चालक मोठ्या रकमेची मागणी करतात, तर रुग्णालयात जाण्यासाठी वेगळे भाडे मागतात, ही पद्धत बंद व्हावी. मुजोर टॅक्सीचालकांवर कारवाई करावी; अन्यथा शेतकरी संघटनेकडून आंदोलन करू."- बाळासाहेब धुमाळ, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, शेतकरी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed ACB: पापाचा घडा भरला! स्वतःला सिंघम समजणारा तहसीलदार निघाला महालाचखोर; ६ लाख ४० हजार रुपये घेताना अटकेत

Pune Crime : प्रेमप्रकरणातून तरुणाने संपविले जीवन; कोरेगाव पार्कमधील प्रकार, पाच जणांवर गुन्हा

DCM Sunetra Pawar : माळेगाव'चे शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट जाहीर

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

SCROLL FOR NEXT