Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : सेल्समननेच मारला दागिन्यांवर डल्ला; CCTVतून प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील कालिकामाता मंदिराजवळ असलेल्या भंडारी ज्वेलर्स दुकानात असलेल्या सेल्समननेच दुकानातील सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित सेल्समन अरुण रामदास महाजन (रा. वनराज रेसिडेन्सी, वनविहार कॉलनी, नाशिक) याच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (robbery on bhandari jewellers by salesman CCTV footage revealed Nashik Latest Crime News)

वैभव अशोक भंडारी (रा. भंडारी रेसिडेन्सी, वेद मंदिराच्या मागे, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाक्यावरील कालिकामाता मंदिराजवळ भंडारी ज्वेलरी गॅलक्सी प्रा. लि.चे शोरूम भंडारी यांच्या मालकीचे आहे. संशयित अरुण महाजन हा या दुकानात ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून तीन ते चार वर्षांपासून येथे कार्यरत होता. २०२० पासून तो दुकानात येणाऱ्या ग्राहकांना दागिने दाखवून विक्री करत असताना कुणाला लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने दुकानातील चांदीचे क्वॉइन, चांदीचे पायल चोरी करणे सुरू केले होते.

दरम्यान नेहमीप्रमाणे दुकानाच्या व्यवस्थापनाने चांदीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू केली. त्यांना चार ते साडेचार किलो ग्रॅम चांदीच्या वस्तू कमी असल्याचे आढळले. त्यानुसार वैभव भंडारी यांनी दुकानात काम करणाऱ्या सर्वच कामगारांकडे विचारणा करून झालेले नुकसान भरून देण्यास सांगितले होते. त्यासाठी एक ते सव्वा महिन्याचा अवधीही दिला. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर भंडारी यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही तपासले.

त्यात महाजन याची हालचाल संशयास्पदरीत्या व दागिने चोरी करताना आढळून आला. त्यानुसार भंडारी यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद व सीसीटीव्ही फुटेज दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करून संशयित महाजन यास अटक करण्यात आली आहे. महाजन यास न्यायालयात हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात महाजन याने चोरलेले दागिने विक्री करून आलेले पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे.

दोन लाख ४३ हजारांची चांदी चोरली

संशयित महाजन याने दुकानातून दोन लाख ११ हजार १५५ रुपयांचे पाच ग्रॅम ते एक किलो चांदीचे तीन हजार २५९ ग्रॅमचे क्वॉइन, २३ हजार १६२ रुपयांचे ५३० ग्रॅम वजनाचे चांदीचे पायल व आठ हजार ९२४ रुपयाचा चांदीच्या फॅन्सी वस्तू अशा एकूण दोन लाख ४३ हजार २४१ रुपयांचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. हवालदार आर. व्ही. सोनार अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT