Villagers publishing a planning pamphlet for the moving coconut program. esakal
नाशिक

Nashik Cultural News: 1970 पासूनच्या फिरत्या नारळाचा कार्यक्रम हे धार्मिक वैभव! यंदा केरसाणेत 9 जानेवारीला सोहळा

उत्तर महाराष्ट्रासह कसमादे परिसरातील धार्मिक वैभवात भर टाकणारा फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाची परंपरा गेली पाच दशके अव्याहतपणे सुरू आहे.

गोविंद अहिरे

नरकोळ : उत्तर महाराष्ट्रासह कसमादे परिसरातील धार्मिक वैभवात भर टाकणारा फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाची परंपरा गेली पाच दशके अव्याहतपणे सुरू आहे.

प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा कार्यक्रम खर्चिक असला तरी ग्रामस्थांची एकजूट, संत परंपरेचा वारसा तसेच समाज व वारकरी संप्रदायाच्या सहभागामुळे सातत्याने यशस्वी होत आहे.

यंदा केरसाणे (ता. बागलाण) येथे ९ जानेवारीला हा सोहळा होत आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. (Rotating Coconut Show Since 1970 Religious Glory This year ceremony will be held on January 9 in Kersane Nashik Cultural News)

या सोहळ्यानिमित्त परिसरात वारकरी संप्रदायात भक्तीमय वातावरण निर्माण होते. १९७० च्या सुमारास गुरुवर्य (वै.) कुष्णामाऊली गुरुजी जायखेडकर यांनी सुरु केलेली ही परंपरा आजही सुरू आहे.

(वै.) गुरुवर्य जोग महाराज, (वै.) गुरूवर्य मामासाहेब दांडेकर, (वै.) गुरुवर्य तुकाराम महाराज गोराणे यांच्या प्रेरणेने व यशोदाआक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरु आहे.

केरसाणेत ९ जानेवारीला शांतिसागर जयराम बाबा गोंडेगावकर, आचार्य हरिभाऊ महाराज भवाडे, विश्वनाथ महाराज तळवाडे, भाऊसाहेब महाराज शास्त्री वाराणसी, अशोक भाऊ भीमाशंकर, नंदलाल महाराज महड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या नारळाचा कार्यक्रम होईल.

या सोहळ्यात यंदा प्रथमच रिंगण सोहळा होणार आहे. सुमारे ७० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन आहे.

केरसाणे येथे ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होईल. माऊलींची पालखी सोहळा, पादुका मिरवणूक, निवृत्तीनाथ महाराज पदयात्रेसह पुढील वर्षात होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजकांसह गावातील मान्यवरांना नारळ सुपूर्द करण्यात येईल.

फिरते नारळ कार्यक्रम म्हणजे?

(वै) गुरुवर्य कृष्णाजी माऊली यांच्या संकल्पनेतून १९७० पासून हा कार्यक्रम होत आहे. गावागावात वारकरी संप्रदायाची संख्या वाढावी, हरिपाठ, प्रवचन, काकड आरती, हरिनाम सप्ताह कार्यक्रम व्हावेत.

यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाल्यास वाईट प्रवृत्तींचा आपोआप विनाश होईल हा हेतू आहे. या सोहळ्यासाठी अनेक गावांना प्रतीक्षा असते.

कार्यक्रम झालेली गावे (१९७० ते २०२४ पर्यंत)

चिराई, महड, राहुड, बोढरी, बहिराणे, बिलपुरी, इजमाने, वरचे व खालचे टेंबे, तळवाडे भामेर, श्रीपुरवडे, बिजोरसे, जपुरपांडे, वडेखुर्द, कजवाडे, चौधाणे, नांदीन, वाघळे, दसवेल, ताहाराबाद, पारनेर, निताणे, खिरमाणी, बिजोटे, कोटबेल, देवळाणे, वायगाव, खामलोण, डांगसौंदाणे, तळवाडे दिगर, गोराणे, आसखेडा, लोहणेर, उत्राणे, दसाने, मुंजवाड, जायखेडा, चिंचावड, तळवाडे, दुंधे (ता. मालेगाव). बहुतांश गावांमध्ये सलग दोनदा कार्यक्रम झाला.

"गुरुवर्य कृष्णा माऊलींनी सुरू केलेली फिरत्या नारळाची परंपरा आजही कायम आहे. यामुळे गावागावात नवचैतन्य निर्माण होते. लहान बालकांमध्ये बालवयातच धार्मिकतेची आवड निर्माण होते. सोहळ्याची सर्वांना उत्सुकता असते." - नंदलाल महाराज, महड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय वाचा एका क्लिकवर

Stock Market Closing: शेवटच्या तासात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 409 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Crime News : तीन वर्षांपूर्वी मित्राच्या बायकोवर जडला जीव...नैनिताल ट्रीपवर पतीला आला संशय....बायकोसह भाजप नेत्याची केली निर्घृण हत्या

Latest Maharashtra News Updates : हैद्राबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

आराध्याला झालं तरी काय? गणपतीच्या दर्शनासाठी आल्यावर अशी का वागली? चाहत्यांना लागली चिंता, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT