RTE1.jpg 
नाशिक

पालकांनो.. निश्‍चिंत व्हा..आरटीई प्रवेशप्रक्रिया लवकरच! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इगतपुरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. 

शाळास्तरावर कागदपत्रांची पडताळणी; समितीच्या मान्यतेने प्रवेश 
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 17 मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेशप्रक्रियाच बंद करण्यात आली. लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेशप्रक्रिया 25 जूनपासून सुरू करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात एक लाख 920 विद्यार्थ्यांची निवड झाली, तर 75 हजार 465 विद्यार्थ्यांची प्रतीक्षायादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. 


1. आरटीई पोर्टलवर शाळेला लॉगिनला विद्यार्थ्यांची यादी दिली आहे. त्यानुसार कोणत्या तारखेला बोलवायचे हे शाळेने ठरवायचे आहे. 
2. मूळ कागदपत्रे जमा केल्यावर पालकांना अलॉटमेंट लेटरवर प्रवेश देताना त्यांच्याकडून हमीपत्र आवश्‍यक. 
3. कोरोनामुळे काही पालक मूळगावी किंवा अन्य जागी स्थलांतरित झाले असण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आले नाहीत तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी, अशी संधी तीन वेळा द्यावी. 
4. सध्या शाळेने प्रतीक्षायादीतील पालकांना बोलवू नये. 
5. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील शाळांनी अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT