RTE admission
RTE admission esakal
नाशिक

RTE ची प्रक्रिया खोळंबली; पुढील प्रवेश वेळापत्रकाची प्रतीक्षा

अरूण मलाणी

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (RTE Law) खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सोडत यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश मुदत संपली असताना, अद्यापही जिल्‍ह्यात सुमारे ३० टक्‍के जागा रिक्‍त आहेत. मात्र, आठवडा उलटूनही रिक्‍त जागांवर प्रवेशासंदर्भात वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम असून, प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे. (RTE process Delayed Waiting for the next admission schedule Nashik Education News)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नाशिक जिल्‍ह्यातील ४२२ शाळांमध्ये प्रवेशासाठी चार हजार ९२७ जागा उपलब्‍ध होत्‍या. या जागांवर प्रवेशासाठी तब्‍बल १६ हजार ५६७ अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत चार हजार ५१३ नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रवेशासाठी दोन वेळा मुदत दिल्‍यानंतर १० मेपर्यंत तीन हजार २८४ जागांवर प्रवेश निश्‍चित झाले आहेत. नियमित प्रवेशाची प्रक्रिया आटोपली असताना, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आठवडा उलटूनही अद्यापपर्यंत रिक्‍त जागांवर प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाही. नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील महिन्‍यापासून सुरवात होत असताना, त्‍याआधी सर्व रिक्‍त जागांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण व्‍हावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्‍यक्‍त केली जात आहे.

त्‍यांनाही मिळावी संधी

यापूर्वी जाहीर केलेल्‍या सोडतीत अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकली नाही. रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य या तत्त्वानुसार अर्ज भरलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शिक्षण विभागाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे या पालकांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे शिक्षण विभागाच्‍या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT