BH series esakal
नाशिक

नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी

नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी

अरूण मलाणी

नाशिक : रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहने नोंदणीसाठी भारत सिरीज उपलब्‍ध करुन दिली होती. ऑगस्‍ट अखेरीस यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले होते. अशात नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयाअंतर्गत BH सिरीजच्‍या पहिल्‍या वाहनाची नोंदणी नुकतीच झाली आहे. यामुळे वाहनधारकाचा अन्‍य राज्‍यात स्‍थलांतरानंतर वाहनाची पुर्ननोंदणीसह अन्‍य ताण मिटणार आहे.

पुर्ननोंदणी, NOC मिळविण्यासारख्या कामांपासून मुक्‍तता

इगतपुरी तालुक्‍यातील ऋषिकेश पंढरीनाथ गायकर यांनी खरेदी केलेले वाहन या नव्‍या सिरीजचे पहिले मानकरी ठरले आहे. नुकतीच या नवीन वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया नाशिक प्रादेशिक परीवहन कार्यालयात पार पडली. राष्ट्रीय पातळीवर ऑगस्‍ट अखेरीस ही सिरीज उपलब्‍ध झाली असली तरी BH सिरीजची प्रथम नोंदणी नुकतीच झालेली आहे. केंद्र शासन, राज्‍य शासनाचे कर्मचारी, लष्कारात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अन्‍य राज्‍यात दीर्घ कालावधीसाठी वास्‍तव्‍य करणाऱ्या वाहनधारकांसाठी ही सुविधा उपलब्‍ध आहे. या सिरीजमुळे संबंधितांना पुन्‍हा अन्‍य राज्‍यातील स्‍थानिक आरटीओ कार्यालयात पुनर्नोंदणी, आधीच्‍या कार्यालयातून NOC मिळविण्यासारख्या कामांपासून मुक्‍तता मिळत आहे.

अशी आहे BH सिरीजची रचना...

भारत सिरीजअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये सुरवातीचे दोन आकडे हे नोंदणीचे वर्ष दर्शविते. त्‍यानंतर BH व पुढे चार आकडी वाहन क्रमांक व शेवटी अक्षर (AA, AB) अशी या वाहनांच्‍या नंबर प्‍लेटची रचना असते.

असा असेल BH सिरीजचा कालावधी

स्थानिक आरटीओ कार्यालयात नोंदणी करताना नोंदणी कराची रक्कम एकदाच भरून १५ वर्षांकरीता वाहनाला परवाना मिळतो, मात्र BH सिरीजमध्ये सुरूवातीला २ वर्षांसाठी नोंदणी होणार असून पुढे ज्या राज्यात वाहन असेल त्या राज्याच्या धोरणानुसार रिन्यू करावे लागेल.

''केंद्र शासनाच्‍या धोरणानुसार भारत सिरीजअंतर्गत नोंदणी सुविधा उपलब्‍ध झालेली आहे. नवीन वाहनधारकांसाठी ही वैकल्‍पिक सुविधा आहे. आरटीओ कार्यालयाअंतर्गत पहिल्‍या वाहनाची भारत सिरीजअंतर्गत नोंदणी झालेली आहे.'' - वासुदेव भागवत, सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: DA वाढीनंतर कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या 3 मोठ्या मागण्या! महागाई भत्ता आणि बेसिक पगारात काय बदल होणार?

India vs Pakistan Live Score : भारताचा लाजीरवाणा पराभव, पाकिस्तानने २३ चेंडूंत ९१ धावा करून जिंकली मॅच; कृणाल पांड्याच्या एका षटकात ३१ धावा

Tukaram Mundhe: मसाले विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

राशिद खानचा ऐतिहासिक विक्रम! T20 क्रिकेटमध्ये 'दुहेरी शतक' करणारा जगातील पहिलाच फिरकीपटू; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

'Samsung W27' ची बाजारात दणक्यात एंट्री! दोन डिस्प्ले, 200MP कॅमेरा आणि तगडा लूक; फोल्डेबल फोनची भन्नाट फीचर्स एकदा पहाच...

SCROLL FOR NEXT