Rummy Rajput esakal
नाशिक

Nashik Crime: ‘मोका’तील रम्मी राजपूत Civil मध्ये दाखल; विद्यमान राजकीय मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे ‘सोय’

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : आनंदवलीतील मंडलिक खून प्रकरणी मोकान्वये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेला रम्मी राजपूत काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली दाखल आहे.

विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे रम्मी राजपूत याची जिल्हा रुग्णालयात ‘सोयी’ युक्त बडदास्त ठेवली जात असल्याचे समजते.

तर, कारागृह व जिल्हा रुग्णालय प्रशासनावर दबावाचा वापर करून रम्मी नेहमीच जिल्हा रुग्णालयात भरती होत असल्याचे सूत्रांकडून समजते. (Rummy Rajput in mcoca admitted in Civil Convenience due to elevation of incumbent political ministers Nashik Crime)

१७ फेब्रुवारी २०२१ ला आनंदवलीतील रमेश मंडलिक या ७० वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने तपास करून भूमाफियांची व्हाईटकॉलर टोळी गजाआड केली.

याप्रकरणी २० जणांविरुद्ध मोकान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. तर, कित्येक महिने फरार असलेल्या रम्मी राजपूतला शहर पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील जंगलातून अटक केली होती.

दरम्यान, गेल्या १० ते १२ दिवसांपासून रम्मी राजपूत हा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली दाखल आहे. त्यास पाठदुखीचा त्रास असल्याचे कारण दाखविले असले तरी प्रत्यक्षात दर दीड- दोन महिन्यांनंतर रम्मी हा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल होत असल्याचे समजते.

यासाठी विद्यमान सत्ताधारी पक्षातील एका राजकीय मंत्र्यांच्या वरदहस्तामुळेच रम्मीला नेहमी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. तसेच, त्या मंत्र्यांच्याच कृपाशीर्वादाने त्याची जिल्हा रुग्णालयात ‘सोयी’ स्कर बडदास्त ठेवली जाते आहे.

त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनावर याच मंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचेही सूत्रांकडून समजते.

काही महिन्यांपूर्वीच रम्मी त्याच्या पत्नीवर वैद्यकीय उपचारासंदर्भात काही दिवसांसाठी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर तो पुन्हा मध्यवर्ती कारागृहात हजर झाला होता. परंतु, राजकीय दबावाचा वापर करून रम्मी जिल्हा रुग्णालयात नेहमीच दाखल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बर्थ-डेही साजरा झाला

रम्मी राजपूत याच्यावर सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचाच वरदहस्त असल्याने खुनाच्या गुन्ह्यात मोक्का असतानाही तो दीड-दोन महिन्यात जिल्हा रुग्णालयात भरती होत असतो. काही महिन्यांपूर्वी रम्मीचा वाढदिवस होता.

त्या वेळीही तो जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली भरती झाला होता. त्याच्या समर्थकांनी वॉर्डच्या बाहेर रम्मीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

यामुळे गंभीर गुन्ह्यातील संशयितासाठी राजकीय पक्षाचा मंत्रीच स्वतः ‘सोयी’ नुसार मदत करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

Alandi Weddings : गुरू-शुक्राच्या अस्तामुळे आळंदीत विवाह मुहूर्त कमी, कार्यालय बुकिंगला थंड प्रतिसाद

SCROLL FOR NEXT