vaccine esakal
नाशिक

१ डिसेंबर पासून कोविड लसीकरणाला लागणार पैसे? लसीकरणासाठी गर्दी

युनूस शेख

नाशिक : सध्या इथल्या लसीकरण केंद्रावर (vaccination center) नागरिकांची गर्दी उसळली आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात दोन प्रश्न कायम आहेत. ते म्हणजे, लस घेण्यासाठी नागरिकांना १ डिसेंबरपासून पैसे लागणार आहे? शिवाय ओमिक्रोन विषाणूंचा धोका वाढला का?

लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी

जुने नाशिक परिसरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांचा लसीकरणाकडे वाढता ओढा बघता ,महापालिकेकडून लसीकरण केंद्राच्या वेळेत वाढ केली आहे. पूर्वी दहा ते दोन अशी वेळ होती सध्या त्यात वाढ करून दहा ते चार अशी वेळ करण्यात आली आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीने ती वेळ देखील कमी पडत आहे. सर्व यंत्रणेची लक्ष जुने नाशिक परिसराकडे लागून होते. येथील रहिवासी लसीकरणास प्रतिसाद देतील किंवा नाही. परंतु येथेही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे

पाचशे ते सातशे रुपये एका नागरिकांस मोजावे लागणार?

दरम्यान कोरोना प्रादुर्भावापासून बचाव होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे नागरिकांना मोफत कोरोना लस दिली जात आहे. विविध अफवांमुळे बहुतांशी नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ केली आहे. सरकारतर्फे सक्ती करण्यात आली होती. तरीदेखील नागरिकांनी त्यास जुमानले नाही. परंतु, गेल्या काही दिवसापासून १ डिसेंबरपासून लसीकरणासाठी पाचशे ते सातशे रुपये एक नागरिकांस मोजावे लागणार आहे, अशा प्रकारची अफवा पसरली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रोन कोरोनाच्या नवीन विषाणूचे संकट उद्भवले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून दक्षता घेतली जात आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारतर्फे नवीन नियमावली घोषित करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे. विविध प्रकारच्या सोहळ्यास हजेरी लावणे यासाठी लसीकरण अनिवार्य केले आहे. यामुळे गेल्या तीन ते चार दिवसापासून लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.

ती एक अफवा...

लस घेण्यासाठी नागरिकांना १ डिसेंबरपासून पैसे लागणार आहे, अशा प्रकारची अफवा काही दिवसापासून शहरात पसरली आहे. शिवाय ओमिक्रोन विषाणूंचा धोका वाढल्याने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली आहे. धान्य बाजार येथील महापालिका शाळा, बडी दर्गा परिसरातील महापालिकेची शाळा, मुलतानपुरा येथील शाळा अशा विविध केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे.

अफवेने करून दाखवले

जे काम सरकारी यंत्रणा नाही करू शकली. ते काम एका अफवेने करून दाखविले. सरकारी यंत्रणेने लसीकरणाचा ओघ वाढावा म्हणून नागरिकांमध्ये विविध प्रकारची जनजागृती केली सक्ती केली. बहुतांशी नागरिकांनी मात्र त्यास दाद दिली नाही. १ डिसेंबर पासून पैसे लागणारा पसरताच नागरिकांनी मात्र जगण्यासाठी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT