trimabakeshwar.jpg 
नाशिक

'इथे' पूजाविधी सुरू करण्याच्या नुसत्याच वावड्या; यंत्रणेची धावाधाव

कमलाकर अकोलकर

नाशिक : त्र्यंबकेश्‍वरला लॉकडाउनमुळे पाच महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्यामुळे गावाचे अर्थकारण ठप्प पडले आहे. अशात स्थानिक पूजाविधी सुरू करण्याचे इव्हेंट झाले; पण प्रत्यक्षात लॉकडाउन काळात असे विधी करण्यास प्रशासनाची कुठलीही परवानगी नाही. त्यामुळे पूजाविधी सुरू करण्याच्या नुसत्याच वावड्या आहेत. मात्र, प्रशासनाची धावाधाव होत आहे.

अर्थकारण त्र्यंबकराजाच्या मंदिरावर अवलंबून

त्र्यंबकेश्‍वराचे मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत शहर आणि त्याचे अर्थकारण बंदच राहणार आहे. त्यामुळे आधी मंदिर सुरू करा, अशी त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांची मागणी आहे. त्र्यंबकेश्‍वर पालिका आणि येथील व्यवसायांचे अर्थकारण त्र्यंबकराजाच्या मंदिरावर अवलंबून आहे. एखादे शहरच पाच महिन्यांपासून बंद राहिल्यास काय होते, याची अनुभूती त्र्यंबकेश्‍वर शहर घेत आहे. पलिकेच्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. हॉटेल व्यवसाय, पूजाविधी, साहित्य विक्रीसह सगळेच व्यवहार ठप्प आहे. दळणवळण थांबले आहे. पर्यटन बंद आहे. भाविक येत नाही. सलग पाच महिन्यांपासून हे चित्र आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून कोरोना महामारीपेक्षाही बेरोजगारीचा विषय गंभीर झाला आहे.

अर्थकारणाला घरघर

अर्थकारण इतके टिपेला पोचले, की येथील पडीक जमिनीला लाखोंचे भाव मिळू लागले. शेतकरी, मंदिर, धार्मिक संस्थाच्या जमिनी घेण्यासाठी त्यांचे गुंठेवारीने प्लॉट पाडून करोड रुपये कमविण्यासाठी भूमाफियांची स्पर्धाच लागली होती. पण कोरोनाच्या महामारीमुळे चित्र पार बदलले आहे. मंदिरबंदमुळे सगळेच व्यवसाय ठप्प आहेत. मंदिरावर रोजगार असलेल्यांवर घरी बसून राहण्याची वेळ आली आहे. पूजाविधी सुरू होण्यासाठी राजकीय स्टंटही सुरू झाले आहे. त्यातून राजकीय नेतेमंडळींना प्रसिद्धी मिळत असली तरी लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मात्र सुटत नाही. त्यामुळे रोज मंदिर सुरू करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे दाखवायचे आणि पूजाविधी सुरू झाल्याच्या वावड्या उठविल्या जात आहे.

संपादन : रमेश चौधरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT