नाशिक : शिकारीसाठी मांजरीच्या मागे पळत असलेल्या सिमेंटचा पत्रा फोडून घरात पडल्याची घटना लहवीत (ता. नाशिक) येथे गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री दोनला घडली. बिबट्या घरात पडल्याची चाहूल लागताच घरातील लोकांनी वेळीच बाहेर पडत आपला जीव वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. (Running after cat leopard came straight into house through cracked roof nashik Latest Marathi News)
दोन दिवसापूर्वी तवली फाटा येथे बिबट्याने तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच लहवित येथे मध्यरात्री सव्वा दोनला येथील शुभम गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय हे झोपले असताना त्यांना मांजर आणि बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.
या वेळी घराजवळ बिबट्या आली असल्याची चाहूल त्यांना लागली. यानंतर ते मागील खोलीत थांबले. मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्या मांजरीच्या मागे धावत असताना मांजर घरावर चढली. त्यानंतर बिबट्यादेखील घरावर चढून मांजरीला पकडण्यासाठी तिच्यावर झडप टाकली असता तो थेट सिंमेटच्या पत्र्यावर पडला.
यानंतर पत्रा फुटल्याने बिबट्या थेट घरातील स्वयंपाक खोलीत पडला. खाली पडल्यानंतर बिबट्या घरातील दरवाजा मागे जाऊन लपला. घरात बिबट्या पडल्याची चाहूल गायकवाड कुटुंबास लागताच त्यांनी मागील खोलीला असलेली खिडकी तोडून घराबाहेर पडले.
घटनेची माहिती तत्काळ वनविभागास कळविण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आणि त्यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ घटनास्थळ गाठून घरात प्रवेशकरत बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या घरात आढळला नाही. त्यानंतर पथकाकडून पहाटेपर्यंत आजूबाजूला बिबट्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांना बिबट्या मिळून आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.