program organized on behalf of Maharashtra State Cooperative Credit Union Federation, the awardees along with State Women's Commission Chairperson Rupali Chakarankar, esakal
नाशिक

Rupali Chakankar | राज्य पतसंस्था फेडरेशनकडून पतसंस्थांचे बळकटीकरण : रूपाली चाकणकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महिला दिन हा एक दिवसा पुरता मर्यादित न राहता प्रत्येक दिवस महिला सन्मानाचा असला पाहिजे. महिला आयोग पुरुषा विरोधात नाही, तर समाजातील विकृती विरोधात आहे. महिला आयोगाकडे दाद मागण्याची वेळ कोणावरही येऊ नये.

इतके चांगले वातावरण समाजात निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. प्रत्येकाची समाजात पत निर्माण करून देण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पतसंस्थांचे हात बळकटीकरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Rupali Chakankar statement Strengthening of Credit Institutions by State Credit Institutions Federation nashik news)

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी (ता.२४) श्रीकृष्ण लॉन्स येथे महिलांसाठी प्रशिक्षण व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चाकणकर बोलत होत्या.

यावेळी अभिनेत्री आशा शेलार, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपकार्याध्यक्ष अॅड. अंजली पाटील, सहसचिव भारती मुथा, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, संचालिका नीलिमा बावणे, अश्विनी बोरस्ते, मंदाकिनी बनकर, राजश्री पाटील, सुशीला नवले, शुभलक्ष्मी कोटे आदी उपस्थित होते.

अध्यक्षा चाकणकर पुढे म्हणाल्या की, समाजात रूढी परंपरेच्या नावाखाली असलेल्या बेड्या उद्ध्वस्त होणे आवश्यक आहे. या बेड्या महिलेने स्वत:हून लावून घेतलेल्या आहेत. कारण सुनेला हुंडा आणायला सांगणारी सासू ही एक महिलाच असते वंशाला वारसदार पाहिजे म्हणून सुनेला त्रास देणारी देखील महिलाच असते.

या आणि अशा प्रकारच्या अनेक रूढी मोडीत निघाल्या पाहिजे. त्यासाठी स्वत:पासून सुरवात होऊन जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी संगीता इनामदार, मालती सावळे, विद्या जायभावे, भारती पवार, स्मिता पोखर्ना, प्रतिभा गोरे, आशा भांगरे, अर्चना राठी, डॉ. आश्लेषा मदनकर, पुनम शाह, श्रुती जोशी, पद्मिनी पारखे, मंजूषा दराडे, अश्विनी बोरस्ते आदींचा गैारव करण्यात आला. स्नेहल सारंग यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

विविध पुरस्काराचे वितरण

महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अंगीकृत ‘सहकार उद्यमी’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या साहाय्याने अनेक पतसंस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकल्प सुरू होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पतसंस्थांमध्ये राज्यभरातील पतसंस्थांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांसाठी बेस्ट चेअरमन, पदाधिकारी, बेस्ट क्लार्क, बेस्ट शिपाई, बेस्ट कॅशिअर, बेस्ट अल्पबचत प्रतिनिधी यांची निवड करण्यात येऊन ‘सक्षम सहकार सक्षम महिला’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कल्याणी महिला पतसंस्थेतर्फे समाजातील प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नावर सर्वंकष अभ्यास करीत या प्रश्नांची सोडवणूक व्हावी व त्याद्वारे परिवर्तन व्हावे. या हेतूने काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींचा सत्कार ‘श्रीमती कल्याणी द्विवार्षिक पुरस्कार’ कल्याण महिला पतसंस्थेच्या माध्यमातून केला जातो यावर्षी संस्थेच्या माजी संस्थापक अध्यक्षा (कै.) श्रीमती माधवी बुरकुले पुरस्कृत ‘श्रीमती कल्याणी वार्षिक पुरस्कार’ सुरेखाताई लवांडे (पुणे) यांना देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

SCROLL FOR NEXT