While rescuing a child laborer who had gone to graze sheep in remote areas esakal
नाशिक

Child labor Crime : बाल मजुरी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिस सतर्क! 2 गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

Child labor Crime : बालकामगार व वेठबिगारी निर्मूलन व जनजागृती मोहीम अधिक व्यापक करून ती अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १ मे कामगार दिनी विशेष पथक निर्माण करून कार्यरत केले आहे. (Rural police alert to prevent child labor 2 cases filed nashik crime news)

अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजात असणाऱ्या गरिबी व दारिद्र्याचा फायदा घेऊन समाजातील अल्पवयीन मुलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात गुंतविण्याचे प्रकार सध्या उघडकीस येत आहेत.

सर्वसाधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास मुले शाळेत जात नाहीत. गरिबीमुळे शाळा न शिकता अनेक मुले कामधंदा करून अर्थार्जन करतात. समाजातील ही अनिष्ट प्रथा संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.

समस्येची सोडवणूक करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक गठित केले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पुष्पा आरणे, प्रमोद आहेर, शिरीष गांगुर्डे, सौ. ढिकले, माधुरी भोसले, योगेश्वर तनपुरे यांनी कारवाई केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दोन अल्पवयीन मुलांची मुक्तता

सदर पथक हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात तसेच अतिदुर्गम भागातील वाड्या-वस्त्या व गावांना भेटी देऊन तेथील स्थानिक पोलिसपाटील, आदिवासी समाजातील नागरिक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची मदत घेणार आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊन बालकामगार व वेठबिगारी निर्मूलनाविषयी प्रबोधन करणार आहेत. त्याचप्रमाणे, वेठबिगारी संदर्भातील काही अप्रिय घटना घडणार नाही, याबाबत जनजागृती करणार आहे.

मोहीमे दरम्यान जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग यांच्या प्रतिनिधींचे मदतीने बाल रोजगारीच्या विळख्यातून दोन अल्पवयीन मुलांची मुक्तता केली आहे.

वाड्यावर शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी ठेवून अल्पवयीन मुलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून बालकामगारास कमी वेतन देऊन त्यांच्याकडून श्रमाचे काम करून घेतले जाते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: पावसामुळे उद्या शाळांना सुट्ट्या; ठाणे, कल्याणमध्ये सुट्टी जाहीर, मुंबईचं काय?

AI Project Revive : आता मृत प्रियजनांशी साधता येणार संवाद , AI ची कमाल, तंत्रज्ञानाबाबत ऐकून वाटेल आश्चर्य

Heavy Rainfall: निसर्ग कोपला, बळीराजाच्या डोळ्यात पाणी; पिकांच्या जागी साचला गाळ, नद्या नाले फुगले

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?

Weekly Love Horoscope : शुक्र-बुध ग्रहाची युती! 'या' 3 राशींच्या लोकात वाढेल प्रेम अन् 'या' 2 राशींच्या नात्याला त्रास

SCROLL FOR NEXT