ramdan.jpg 
नाशिक

"कहीं खुशियॉं तो कहीं गम.."कोरोनामुळे अनेकांची ईद दुःखात 

युनूस शेख :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदाची रमजान ईद कोरोनाच्या सावटाखाली "कहीं खुशियॉं तो कहीं गम' अशा वातारणात मुस्लिम बांधवांकडून साजरी करण्यात आली. अनेकांच्या नातेवाईक, कुटुंबीयांचा कोरोनाशी लढा देताना मृत्यू झाला, तर अनेक जण रुग्णालयात कोरोनाशी दोन हात करत असल्याचे चित्र मालेगावसह शहरातही बघावयास मिळाले. 

कुणाच्या डोळ्यात अश्रू, तर कुणाच्या डोळ्यात आनंद
अनेकांचे अख्खे कुटुंब कोरोनाबाधित होऊन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बहुतांश कुटुंबीयांच्या घरांना टाळे लागले आहे. याचे बोलके चित्र मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाले. जुने नाशिक येथील नाईकवाडीपुरा भागातील संपूर्ण कुटुंब बाधित झाल्याने त्यांचे घर रमजान ईदच्या दिवशी बंद होते. वडाळागाव येथेही अनेक जण बाधित आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारी घेत त्यांच्या कुटुंबीयांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अडकलेले 208 मुस्लिम बांधव तब्बल अडीच महिन्यांनंतर घरी परतल्याने त्यांना कुटुंबीयांबरोबर ईद साजरी करता आली. त्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू, तर कुणाच्या डोळ्यात आनंद बघावयास मिळाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad Announced: हार्दिक पांड्याचे भारतीय संघात पुनरागमन! द. आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी शुभमन गिललाही संधी, पण...

Uddhav Thackeray: ...ही तर सत्तेसाठी लाचारी, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

Latest Marathi News Live Update : विजेचा धक्का लागल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Sangli News : आटपाडीत ८०% मतदानाची ऐतिहासिक नोंद; कोणाला तारण, कोणाला घातसंपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे

Mumbai Traffic: मुंबईच्या ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार! एलबीएस ते बीकेसीपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी जोडणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT