Officials of Nashik Cyclist Foundation felicitating Sahil Jha who gave the message of soil conservation through cycling. esakal
नाशिक

Nashik News : सायकलवारीतून ‘तो’ देतोय देशाला माती संवर्धनाचा संदेश!

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : साधारणत: इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची दिनचर्या बघितली, तर त्यात दैनंदिन अभ्यास, मित्रमंडळी, गप्पा आणि खेळ यापलीकडे विशेष काही नसते. परंतु, कोलकाता येथील यंदा दहावीची परीक्षा दिलेला एक हरहुन्नरी युवक याला अपवाद आहे. माती संवर्धनाच्या प्रचारासाठी सायकलद्वारे भारत यात्रेवर निघालेल्या या सायकलवीराचे नाव साहिल झा असे आहे. (sahil jha giving message of soil conservation to country through cycling Nashik News)

गेल्या आठ महिन्यांत आठ राज्यांत सायकलीने दरदिवशी सरासरी १०० किलोमीटर प्रवास करीत साहिल पुणे, मुंबईनंतर मंगळवारी (ता. २७) नाशिकमध्ये दाखल झाला असून, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनने त्याचे जोरदार स्वागत केले. साहिलने १ मेपासून ही मोहीम सुरू केली. पश्‍चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांच्या दौऱ्यात त्याने हजारो नागरिकांशी संवाद साधला.

या मोहिमेत तो ‘माती वाचवा’चा संदेश देत आहे. साहिलने ७ हजार किलोमीटर सायकलवारी करण्याचा निर्धार केला आहे. विविध राज्यांतील नागरिकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष सचिन नरोटे, सुरेश डोंगरे, किशोर काळे, भाऊसाहेब काळे, संजय पवार, जगन्नाथ पवार, अनिल राऊत, सतीश महाजन, संदीप देवरे, मिलिंद इंगळे, जितेंद्र गोसावी आदींच्या हस्ते साहिलचा सत्कार झाला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

"भारत कृषिप्रधान देश असून देशातील १०० कोटीहून अधिक नागरिक शेती व्यवसायाशी निगडित आहेत. त्यामुळे भारतात माती वाचवा मोहिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या अन्नाची गरज पूर्ण करणारी धरणी माता सुजलाम सुफलाम राहावी, यासाठी माती संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे. या मोहीमेत आपण सर्वांनी जोडले गेले पाहिजे."

-संदीप देवरे, पर्यावरणप्रेमी, नाशिक

"निसर्गाने दिलेली माती ही आपल्या मालकीची नसून, आपण फक्त विश्‍वस्त आहोत. भावी पिढ्यांकडे आपण हा वारसा पोचवायला हवा. प्रत्येकाने कृतिशील प्रयत्न करायला हवेत. तरच जग वाचेल. निसर्ग संवर्धन करायचे असेल, तर मातीशी नाते जोडायला हवे."

-किशोर माने, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन,

"हवामान बदलाचे विपरित परिणाम आपण सध्या पाहात आहोत. त्यामुळे मातीच्या ऱ्हासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. साहिल झा यांनी सुरू केलेली पर्यावरणपूरक ‘सेव्ह सॉईल’ मोहीम प्रेरणादायी आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करायचा असेल, तर चांगली जमीन हवी. तरच पिके चांगले येतील."-सचिन नरोटे, उपाध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT