Dagdusheth Ganpati mandir & sahyadri farms esakal
नाशिक

Sahyadri Farms : दगडूशेठ गणपतीला येत्या संकष्टीला सह्याद्री फार्म्सतर्फे द्राक्षांची आरास!

अनाथाश्रम अन सेवाभावी संस्थांना द्राक्षांचा प्रसाद भेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेतकऱ्यांची शंभर टक्के मालकी असलेल्या जिल्ह्यातील मोहाडीच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ताज्या, रसायनमुक्त द्राक्षांची आरास केली जाणार आहे.

संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी (ता.११) दगडूशेठ हलवाई गणपतीला द्राक्षे अर्पण केली जातील. ही द्राक्षे नंतर भाविकांमध्ये ससून रुग्णालयातील रुग्णांना, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. (Sahyadri Farms grapes decoration for Dagdusheth Ganapati on sankashti chaturthi nashik news)

सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचा प्रसाद फाल्गुनातील संकष्टी चतुर्थीला २ हजार किलो द्राक्षे नैवेद्य आणि प्रसाद स्वरूपात दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यात येणार आहे.

हवामानातील बदलांमुळे आणि बाजारभाव पडल्यामुळे द्राक्षशेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांच्या वतीने साकडे घालण्यात येणार असल्याचे सह्याद्री फार्म्सतर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

द्राक्षांचा प्रसाद कशासाठी ?

भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्यादृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि ‘क' जीवनसत्त्वाचे चांगले स्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो.

द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.

द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात, अशीही माहिती ‘सह्याद्री‘तर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT