Sakal logos esakal
नाशिक

SAKAL Achievement: उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ’ला दुहेरी यश! सकाळ साप्ताहिक’, ‘सकाळ मनी’ला पारितोषिक

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Achievement : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची स्पर्धा घेण्यात आली. परीक्षकांनी निकाल जाहीर केला. स्पर्धेत ‘सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला दुहेरी यश मिळाले.

ललित विभागात ‘सकाळ साप्ताहिक’ला द्वितीय, विशिष्ट विषयातील प्रथम पुरस्कार ‘सकाळ मनी’ला मिळाला. दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना पुरस्कार दिले जातील. मुखपृष्ठासाठीचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार या दोघांना दिले जातील. (SAKAL Achievement Double success for Sakal in excellent Diwali issue competition saptahik Money awarded nashik news)

नाशिकमधील कलाकुंज प्रकाशनच्या ‘हास्य धमाल’ला विनोदी विभागातील उत्तेजनार्थ, ललित विभागात शब्दमल्हारच्या ‘शब्दमल्हार’ला प्रथम, संकीर्ण विभागात सार्वजनिक वाचनालयाच्या ‘साहित्य सावाना’ला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.

विभागनिहाय प्रकाशनचा पुरस्कार विजेता दिवाळी अंकाचे नाव असे : विनोदी ः प्रथम- मुंबईचे भारतभूषण पाटणकर-आवाज, द्वितीय- पुण्याचे मेनका- जत्रा. ललित- साताराचे डॉ. बसवेश्‍वर चेणगे-गुंफण.

विशिष्ट- द्वितीय- पुण्याचे वेदांतश्री- वेदांतश्रीः, उत्तेजनार्थ- ठाण्याचे व्यास क्रिएशन्स- ज्येष्ठविश्‍व. उपयुक्त व छंदविषयक ः प्रथम- पुण्याचे दिनमार्क-‘मी’ (पाणी विशेषांक), द्वितीय- ठाण्याचे व्यास क्रिएशन्स- पासबुक आनंदाचे, उत्तेजनार्थ- पुण्याचे प्रसाद- प्रसाद.

बालकुमार- प्रथम- लोणावळाचे मनशक्ती-मनशक्ती बालकुमार, द्वितीय- पुण्याचे केसरी मराठा ट्रस्ट- छावा, उत्तेजनार्थ- पुण्याचे वंचित विकास- निर्मळ रानवारा. संकीर्ण- प्रथम-पुण्याचे स्त्रीशक्ती प्रबोधन- समतोल, द्वितीय- डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे फाउंडेशन- चांगुलपणाची चळवळ.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

मुखपृष्ठ पुरस्कारार्थी

मुखपृष्ठासाठीचे प्रथम, द्वितीय, उत्तेजनार्थ पुरस्कारार्थी दिवाळी अंकाची नावे अशी ः (कंसात अनुक्रमे प्रकाशक आणि चित्रकारांचे नाव) : गंधाली (मुंबईमधील कुमुद वर्तक- चित्रकार मनोज आचार्य), मुक्तपर्व (नांदेडचे दैनिक उद्याचा मराठवाडा- चित्रकार नागपूरचे विवेक रानडे), शुभम (पुण्याचे प्रिय प्रकाशन- चित्रकार वर्षा खरटमल)

नाशिकमध्ये ७ मेस पुरस्कार प्रदान

नाशिक येथे ७ मेस होणाऱ्या चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात सकाळी दहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ॲड. उज्ज्वल निकम, अशोक कोठावळे, रामदास भटकळ, प्रवीण दवणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाला मोठं वळण! आरोपीबाबत बाल न्याय मंडळाचा महत्त्वाचा निर्णय

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Raigad News: मुसळधार पावसाची ठिकाणं प्रशासनाकडून दुर्लक्षित, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर सुट्टीचे आदेश जारी; पालक संतप्त

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

SCROLL FOR NEXT