civil hospital latest marathi news esakal
नाशिक

SAKAL Exclusive : शवागारासाठी 80 लाखांचा प्रस्ताव शासनदरबारी! अर्थसंकल्पापूर्वी मंजुरीची अपेक्षा

नरेश हाळणोर

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागाराची दुरवस्था झालेली आहे. शवागाराचे कॉम्प्रेसर बंद असल्याने याठिकाणी मृतदेह ठेवले जात नाहीत. मात्र त्यामुळे अनेक समस्याही उद्‌भवत असून, सोयीसुविधायुक्त असे नवीन शवागारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने शासनाला ८० लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.

यासाठी रुग्णालयीन प्रशासनाकडून सतत पाठपुरावा सुरू असून, राज्याच्या येत्या अर्थसंकल्पापूर्वी या प्रस्तावास मंजुरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, शवागारासाठी सीएसआरच्या माध्यमातून एका कंपनीकडे प्रस्ताव होता परंतु काही तांत्रिक कारणास्तव तो मंजूर होऊ न शकल्याने रुग्णालयाला शासनाच्याच निधीची प्रतिक्षा आहे. (SAKAL Exclusive 80 lakhs proposal to state government for mortuary Approval expected before Budget nashik news)

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन कक्ष आणि त्यालगतच शवागार कक्ष आहे. येथील शवागारामध्ये कॉम्प्रेसरच्या ५४ पेट्या आहेत. अनेक वर्षांपासून शवागारात चांगल्या प्रकारे देखभाल दुरुस्ती न झाल्याने शवागारातील ५४ पेट्या बंद आहेत. शवपेट्यांचे कॉम्प्रेसर बंद पडले असून पेट्यांचे प्रवेशद्वारही नादुरुस्त आहेत.

त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान स्थिर राहत नाही व मृतदेहांचे दुर्गंधीयुक्त पाणी सर्वत्र पसरत असते. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शवागाराचा प्रश्न निधीअभावी सुटलेला नाही.

शवागाराच्या देखभालीसाठी जिल्हा रुग्णालयाने एका कंपनीला ठेका दिला होता. परंतु त्या कंपनीमार्फत वेळेवर सेवा मिळत नव्हती. त्यामुळे अनेकदा शवागारातील कॉम्प्रेसर नादुरुस्त होऊन त्यात विजेचा प्रवाह उतरल्याने कर्मचाऱ्यांना विजेचे शॉक बसल्याचेही प्रकार घडले होते.

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे अखेर जिल्हा रुग्णालयाने शवागार बंद करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह ठेवायचे असेल तर ते संदर्भ सेवा रुग्णालयाच्या शवागारात ठेवले जातात.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नवीन शवागाराचा प्रस्ताव

जिल्हा रुग्णालयाने नवीन शवागाराची मागणी शासनाकडे केली आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने ८० लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. सदरच्या प्रस्तावाला शासनाच्या आगामी अर्थसंकल्पापूर्वी मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

तांत्रिक अडचणीचा अडसर

अनेक कंपन्यांना व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर फंड) निधी असतो व या निधीचा वापर करण्यावरही जिल्हा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने नव्याने उभारण्यात येणाऱ्या शवागारासाठी एच.ए.एल. कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता.

एचएएलने यासंदर्भात सकारात्मकता दर्शवत प्रशस्त शवागार व शवविच्छेदन कक्ष उभारण्याची तयारीही दर्शविली होती. परंतु यादरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे सदरचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही

"शवागारासाठी एका कंपनीकडे प्रस्ताव दिला होता. त्यांचा सकारात्मक प्रतिसादही होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सीएसआरमधून ते होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाकडे ८० लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे. येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत त्यास मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. मंजुरी मिळाल्यास सुसज्ज असे शवागार उभारले जाईल."
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT