Sakal-Exclusive esakal
नाशिक

SAKAL Exclusive : तलाठ्यांच्या सहायकांकडून गावठाणच्या सातबारा- सिटीसर्व्हे परस्पर बदल!

तलाठ्यांच्या सहायकांकडून गावठाणच्या सातबारा- सिटीसर्व्हे परस्पर बदल

विनोद बेदरकर

SAKAL Exclusive : नाशिक शहरात पारंपारीक सातबारा उताऱ्यांचे रेकॉर्ड शहरी सिटीसर्व्हेच्या रेकॉर्डवर ओढण्याच्या उपक्रमा दरम्यान गावठाणातील तलाठी कार्यालयात त्यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी काहींनी काड्या करताना शहरातील शेकडो नागरिकांच्या प्रॉपर्टीकार्डावर परस्पर घोळ घालीत देशोधडीला लावल्याचा प्रकार पंचक, आनंदवल्ली, वडाळ्यापासून गावोगावच्या भागात उघडकीस येत आहे.

परिणामी, एकाच मिळकतीवर- सातबारा उताऱ्यावर आणि शहरातील सिटी सर्व्हेवर क्षेत्रात प्रचंड तफावती बघावयास मिळत आहेत. (SAKAL Exclusive Gavthan Satbara Citysurvey mutual change from Talathis assistants nashik news)

एकाच मिळकतीसाठी एकाच खातेदाराला सातबारा, शेतसारा आणि सिटीसर्व्हे एनए टॅक्स असे दोन कर आकारले जातात.

शिवाय गावोगावच्या तलाठ्यांच्या सहाय्यकांनी केलेल्या कागदोपत्री काड्यामुळे संबंधित प्रॉपटीधारकांना अपिलात जाण्यापासून कायदेशीर लढाईच्या आर्थिक भुंदर्डाला सामोरे जावे लागत आहे. एकूणच शहरातील अनेक जागा प्लॉटचे मालक या सहाय्यकांच्या कागदोपत्री काड्यामुळे देशोधडीला लागत असल्याने या छुप्या रॅकेटची चौकशी होण्याची गरज आहे.

भूमि अभिलेखच !

दुदैव म्हणजे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यामुळे चर्चेत असलेल्या भूमी अभिलेख विभागात याचे पाळेमुळे पोहचत आहे. जागा मोजणीसाठी अनेकदा मंडळी जात नाही. मोजणीसाठी नोटिसा काढल्या जात नाही.

काढल्या तरी त्या पोहोचू दिल्या जात नाही. पोहोचल्या तर मोजणीच्या वेळा पाळल्या जात नाही. अर्जदार नसतांना परस्पर कधी तरी मोजण्याकरून परस्पर क्षेत्र कमी करण्याचे उद्योग होतात. सिटीसर्व्हेच्या अशाच एका नोंदीत पंचकला तलाठी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील अर्जदार प्लॉटधारकच गैरहजर दाखवून जागेचा थेट जवळपास ६० वार जागाच गायब केला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एकूणच तलाठी दप्तरी असलेले सातबारे उतारे न पाहताही अनेक भागात सिटीसर्व्हेवर मोजण्या करून नोंदी केल्याचे प्रकारामुळे वर्षानुवर्षाचे गाव दप्तरातील सातबारा उताऱ्यानुसारचे क्षेत्र आणि त्यानंतर गावठाणाचे सिटीसर्व्हेत समावेश झाल्यानंतर सिटी सर्व्हेच्या रेकॉर्डवरील क्षेत्र यात तफावती आहेत.

सिटीसर्व्हेच्या दप्तरी कमी जागेच्या नोंदी झाल्याने अनेक प्लॉटधारकांना त्यांच्या जागेवर इमारतीसाठी प्लॅन तयार करता येत नाही. किंबहुना महापालिकेची बांधकाम परवानगी मिळत नाही. प्लॉटधारकांना नाडणारे असे दृष्ट्रचक्र यातून तयार झाले आहे. ज्यात अखेरच्या चक्रापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर जागा मालक असलेल्या प्लॉटधारकांची आर्थिक अडवणूक होत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

गैरप्रकारातून तिजोरी भरण्याची समांतर व्यवस्था

शहरातील गावोगावच्या काही तलाठी सहाय्यकांनी कागदोपत्री घोळ घालून निर्माण केलेल्या तफावतीच्या जागांच्या उलाढालीतून काही मंडळीनी उखळ पांढरे करून घेण्याच्या या प्रकारातून वर्षानुवर्षे एकाच प्लॉटवर सातबारा आणि सिटीसर्व्हे या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्राच्या नोंदी पाहायला मिळतात.

प्लॉटधारकांच्या जेव्हा कधी हा प्रकार लक्षात येतो तेव्हा पुन्हा जागा मोजून करून घेण्यासाठी याच यंत्रणेची पायापडणी करावी लागते. त्यात अपील करणे, अपिलासाठी लागणारे गाव नकाशे, सनदी, यासह इतर कागदपत्र काढण्यासाठी पुन्‍हा प्रत्येक टेबलावर प्रत्येक कामासाठी वेगळे शुल्क आणि लाच द्यावी लागते.

भूमि अभिलेख कार्यालयात अपील म्‍हणजे अशाच नाडल्या गेलेल्यांची उदाहरण आहे. या सगळ्या घोळांतून शासनाच्या महसूल विभागातील वार्षिक उदिष्ट्यपुर्तीचा आलेख मात्र उंचावत आहे. जणू नागरिकांची लूट करीत स्वतःचे आणि शासनाच्या तिजोरी भरण्याची समांतर व्यवस्थाच या गैरप्रकारातून उभी राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT