MUHS latest marathi news
MUHS latest marathi news esakal
नाशिक

SAKAL Exclusive: MBBS परीक्षेत आता प्रत्‍येक धड्यावर प्रश्‍न; ब्लू प्रिंट तयार करणारे MUHS देशातील पहिले विद्यापीठ

अरुण मलाणी

नाशिक : एमबीबीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात आता प्रत्‍येक विषयाच्‍या सर्व धड्यांवर आधारित प्रश्‍नांचा परीक्षेत समावेश केले जाणार आहे. कुठल्‍या प्रकरणाला किती भारांक (वेटेज) द्यायचे यांसह सविस्‍तर अशी रूपरेषा (ब्लू ‍प्रिंट) महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे साकारलेली आहे.

त्‍यामुळे प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांमध्ये स्पष्टता येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व धड्यांचा अभ्यास करावा लागेल. सोबतच कुठल्‍या धड्याला किती महत्त्व द्यायचे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये स्‍पष्टता येईल.

ब्लू ‍प्रिंट साकारणारे हे देशातील पहिले आरोग्‍य विद्यापीठ ठरले असून, अन्‍य विद्यापीठांसाठी दस्‍तऐवज दिशादर्शक ठरणार आहे. (SAKAL Exclusive Questions on Every Subject Now in MBBS Exam MUHS first university in country to create blueprint nashik news)

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदाची जबाबदारी स्‍वीकारल्‍यानंतर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्हीजन डॉक्‍युमेंट सादर केले होते. त्‍याअंतर्गत विद्यापीठाच्‍या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडविले जात असून, त्‍याचे सकारात्‍मक परिणाम दिसू लागले आहेत.

आता कुलगुरू डॉ. कानिटकर यांच्‍या संकल्‍पनेतून व मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू व अन्‍य तज्‍ज्ञांच्‍या समिती सदस्‍यांनी मैलाचा दगड गाठला आहे. एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्‍या परीक्षेकरिता विद्यापीठातर्फे ‘ब्लू ‍प्रिंट’ साकारलेले आहे. या रूपरेषा पुस्‍तिकेचे प्रकाशन नुकताच झालेल्‍या दीक्षान्त समारंभात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात आले आहे.

सहा महिन्‍यांपासून मंथन

ब्लू ‍प्रिंट तयार करण्यासाठी वरिष्ठ शिक्षकांनी प्राथमिक स्‍तरावर अध्ययन करून आराखडा तयार केला. यानंतर समिती सदस्‍यांची विद्यापीठात कुलगुरूंच्या उपस्‍थितीत बैठक होऊन दस्‍तऐवज पूर्णत्‍वास आले. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे सहा महिने चालली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यापूर्वी अशी होती कार्यप्रणाली

आत्तापर्यंत एमबीबीएसच्‍या परीक्षांमध्ये प्रकरणनिहाय गुणवारी निश्‍चित नव्‍हती. त्‍यामुळे एखाद्या विषयाचा पेपर क्रमांक एक व दोनमध्ये काही धड्यांवरील प्रश्‍नांची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता होती.

तर काही धड्यांवरील प्रश्‍नांचा अंतर्भाव करण्याचे राहून जाण्याची शक्‍यता असायची. कुठल्‍या धड्याला किती गुण असावे, याबाबतही स्‍पष्टता नव्‍हती. प्रत्‍येक प्रश्‍नपत्रिका तयार करणारे तज्‍ज्ञ वेगवेगळे असल्‍याने कुणी कुठल्‍या धड्यावर आधारित प्रश्‍नांचा समावेश करावा, कुठल्‍या धड्यासाठी किती गुण असावे, याबाबत सुसूत्रता नव्‍हती.

सर्व पदवी अभ्यासक्रमांचे साकारणार ब्लू ‍प्रिंट

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्‍या या संरचनेची प्रत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्‍या माहितीसाठी संकेतस्‍थळावर दस्‍तऐवज उपलब्‍ध केले जाणार आहे.

याशिवाय देशभरातील अन्‍य विद्यापीठांना ही रूपरेषा पाठविली जाणार असून, त्‍यांनाही अंमलबजावणीसाठी पथदर्शी ठरणार आहे. दरम्‍यान, आता एमबीबीएसपाठोपाठ पदवी अभ्यासक्रम आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी (बीपीटीएच), बी.एस्सी (नर्सिंग) यांसह सर्व पदवी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांकरिता अशाच प्रकारे ब्लू ‍प्रिंट साकारली जाणार आहे.

आरोग्‍य विद्यापीठाच्‍या ब्लू ‍प्रिंटचे असे होणार फायदे-

* प्रश्‍नपत्रिकेत प्रत्‍येक धड्यावर आधारित प्रश्‍नांचा समावेश

* धड्याचे महत्त्व लक्षात घेऊन गुणांकन, विद्यार्थ्यांमध्ये येणार स्‍पष्टता

* शास्‍त्रोक्‍त (सायंटिफिक) सूत्रानुसार प्रश्‍नापत्रिकेची असेल रचना

* प्रश्‍नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत येणार सूसुत्रता

* विद्यार्थ्यांना संपूर्ण विषयाचा करावा लागणार अभ्यास

* जूनच्‍या उन्‍हाळी सत्र परीक्षांपासून नवीन रचनेची अंमलबजावणी

* एमबीबीएसच्‍या सर्व वर्षांच्‍या परीक्षांसाठी अंमलबजावणी

"‘एमबीबीएस’च्‍या परीक्षा पद्धतीत सुसूत्रता, सर्वसमावेशकता आणण्यासाठी विद्यापीठाने ब्लू ‍प्रिंट तयार केली. यामुळे प्रश्‍नपत्रिका साकारताना स्‍पष्टता येणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होईल. नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी)सह देशभरातील सर्व आरोग्‍य विद्यापीठांना दस्‍तऐवजाची प्रत माहितीस्‍तव पाठवणार असून, त्‍यांच्‍यासाठी दिशादर्शक ठरेल."

- कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त), महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT