Due to unseasonal rains, the wedding hall was soaked due to the wedding ceremony in the farm esakal
नाशिक

SAKAL Exclusive : अवकाळी पावसाने लग्नसोहळ्याचे वाजले की बारा! शेतमळ्यातील सोहळ्यांना सर्वाधिक फटका

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Exclusive : कसमादे परिसरात मे महिना उजाडताच लग्न सोहळ्यांची धूम सुरु झाली आहे. मेहंदी, मांडव, हळद व लग्न आदी विविध कार्यक्रमांमध्ये अवकाळी पाऊस अडथळा ठरत आहे.

चार दिवसापासून रोज पाऊस हजेरी लावत असल्याने वऱ्हाडींची तारांबळ उडत आहे. वधू-वर पित्यांची तर पावसाने चांगलीच दमछाक केली आहे. मे महिन्यात केवळ १४ लग्नतिथी आहेत. त्यामुळे एकाच दिवशी शेकडो विवाह सोहळे होत आहेत.

लॉन्स, मंगल कार्यालये उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबीयांनी शेतमळ्यात विवाहाचे नियोजन केले आहे. शेतमळ्यात विवाह असलेल्या कुटुंबीय व वऱ्हाडींना पावसाचा सर्वाधिक त्रास होत आहे. (SAKAL Exclusive Unseasonal rains wedding ceremony disturbed Farm celebrations most affected nashik news)

यंदा १ ते २७ एप्रिल या कालावधीत अस्त असल्याने लग्न सोहळे बंद होते. काही प्रमाणात लग्न पार पडले. शाळा, विद्यालयांना सुट्या असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबीय मे महिन्यात लग्न सोहळा करण्यास प्राधान्य देतात.

मे महिन्यात १४ तर जूनमध्ये १२ लग्नतिथी आहेत. अस्त व मे महिन्यातील कमी लग्नतिथींमुळे शहर व परिसरातील मंगल कार्यालय, लॉन्स हाऊसफूल आहेत. त्यामुळे अनेकांनी शेतमळ्यांमध्ये विवाह सोहळ्यांचे नियोजन केले आहे.

अलीकडे विवाह सोहळा किमान तीन दिवसाचा झाला आहे. मेहंदी, दुसऱ्या दिवशी मांडव, हळद व रात्रीचे नाचणे. तिसऱ्या दिवशी लग्नसोहळा असतो. काही कुटुंबीय तर चौथ्या दिवशी रिसेप्शन ठेवतात. शेकडो कुटुंबीयांच्या नियोजनावर अवकाळी पावसाने पाणी फिरविले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अवंलबून व्यवसायांवर परिणाम

सध्या काही दिवसापासून वादळी वारा व अवकाळी पाऊस रोजचा झाला आहे. त्यामुळे वऱ्हाडी मोजक्याच कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्याचा परिणाम अन्न वाया जाण्यावर होत आहे. पावसामुळे लग्नसोहळे असलेले कुटुंबीय व वऱ्हाडींची तारांबळ उडत आहे.

महागडी वाजंत्री लावूनही तिचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. कसमादे परिसरात मुक्कामी आल्यासारखा पाऊस रोज हजेरी लावत असल्याने आगामी काळात होणाऱ्या विवाहसोहळ्यांबाबत वधु-वर पित्यांमध्ये व कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

ऐन लग्न सराईत पाऊस धुमाकूळ घालत असल्याने रसवंतीगृह, शीतपेय, रिक्षा व खासगी वाहन चालकांवरही त्याचा परिणाम होत आहे.

"शेतमळ्यातील प्रशस्त जागेत मुलगा हृषीकेश याचा मांडव, हळद आदी कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मंडप पूर्णपणे भिजला. तसेच नातेवाईक व वऱ्हाडी देखील पावसात सापडल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. पावसामुळे उद्या वेळेत लग्न लावले जाईल." - गणेश शेवाळे, वर पिता, टेहरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT