Vinoba App
Vinoba App esakal
नाशिक

SAKAL Exclusive : प्राथमिक शिक्षकांच्या मदतीला Vinoba App!

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी विनोबा ऍपचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या ऍपमध्ये करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाउंडेशनचे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या माध्यमातून उच्च गुणवत्तेवर आधारित के -१० शिक्षणपद्धती आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. (SAKAL Exclusive Vinoba App to help Primary Teachers nashik news)

शिक्षणाच्या अनुभवाबाबतीत शाळेतील ९० टक्के विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो.‘विनोबा’ हे एक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ऍप आहे. उच्च गुणवत्तेसाठी याचा आगामी काळात फायदा होणार आहे. शिक्षकांचा दैनंदिन कामातील वेळ वाचवून शिक्षकांना काही अर्थपूर्ण काम करण्यास वेळ मिळावा व यासाठी एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे.

विनोबा हे शिक्षकांसाठी एक असे व्यासपीठ आहे, ज्यावर शिक्षकांना सोपे व्हावे व त्यांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता यावे यासाठी पाठांचे नियोजन, उपक्रम, कार्यपत्रके, नेमून दिलेली, पूर्ण केलेली कामे (असाइन्मेंट्स) इथे सहज उपलब्ध होतात.

शिका आणि आदान प्रदान करा

ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांमधील शिक्षक त्यांचे काम, जसे- क्लब उपक्रम, प्रकल्प, शिक्षण साधने, वर्गात वापरलेल्या काही नावीन्यपूर्ण गोष्टी, शिक्षकांचे वैशिष्ठ्यपूर्ण अनुभव वगैरे इथे सहज शेअर करू शकतात.

तुम्ही इतर शिक्षकांनी केलेले काम पाहू शकता, त्याला लाईक करू शकता व त्यातून शिकू शकता. तुम्ही पोस्ट केलेले तुमचे काम क्लस्टर प्रमुख, ब्लॉक प्रमुख तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी देखील पाहतात. शिक्षकांच्या चांगल्या कामाचे क्लस्टर प्रमुख, ब्लॉक प्रमुख तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्याकडून कौतुक होते.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

समन्वयासाठी ठरणार उपयुक्त

विनोबा या ॲपचा उपयोग एखाद्या कार्यक्रमांसंबंधी संवाद साधण्यासाठी तसेच अभिप्राय देण्यासाठी ही केला जातो. जसे निपुण भारत (FLN) या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य वितरित करणे, विविध शैक्षणिक स्तरांवर विद्यार्थ्यांची माहिती जमा करणे, निपुण भारतमध्ये सांगितलेले उपाय वापरून विद्यार्थी व शाळांमधील प्रगतीचा मागोवा घेणे या करता "विनोबा" ऍपचा उपयोग होतो.

शिक्षण परिषदेच्या पूर्व चाचणी व उत्तर चाचणी करता, शाळा सुधार कार्यक्रम, साधन व्यक्ती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमासाठी देखील ‘विनोबा’ हा कार्यक्रम वापरला जातो. आता तो गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी देखील वापरला जात आहे.

शिक्षकांच्या वेळेचाही सदुपयोग

शिक्षकांचा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये काही गोष्टी जमवण्यात व देण्यामध्ये खूप वेळ जातो. असा वाया जाणारा वेळ ‘विनोबा’ च्या वापराने वाचवता येतो. जसे शाळेचा पोर्टफोलिओ, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांनी शाळेचा पोर्टफोलिओ बनतो.

शिक्षकांच्या पोस्ट्स आणि मिळालेले पुरस्कार आपोआपच संग्रहित होतात व पोर्टफोलिओ बनतो. वारवार द्यावी लागणारी माहिती जसे पुस्तक वितरण, गणवेश वितरण, पायाभूत सुविधाबद्दल माहिती हे देखील ‘विनोबा’ कार्यक्रमातून प्राप्त होऊ शकते.

"प्रत्येक माणसाच्या सर्वांगिण प्रगतीला चांगले शिक्षण हाच एकमेव घटक आहे. आजच्या घडीला उच्च गुणवत्तेसाठी विविध उपक्रम सुरु आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती व्हावी व एकमेकांना प्रेरणा मिळावी हाच महत्वाकांक्षी उद्देश ठेवून विनोबा अँपचा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. याचे दूरगामी परिणाम नक्कीच दिशादर्शक राहतील असे विश्वासाने वाटते." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT