JalJeevan Mission
JalJeevan Mission esakal
नाशिक

SAKAL Exclusive : जलजीवन गावासाठी की ठेकेदार पोसण्यासाठी? गावांच्या कारभाऱ्यांचा प्रश्‍न

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : ‘हर घर जल’ अन दरडोई ५५ लिटर पाणी मिळणार नसेल, तर जलजीवनच्या योजना गावासाठी की ठेकेदार पोसण्यासाठी? गावांच्या कारभाऱ्यांकडून हा गंभीर प्रश्‍न उपस्थित होऊ लागल्याने एकूणच जलजीवनच्या कार्यप्रणालीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

चांदवड, नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा, मालेगाव, पेठ, सुरगाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर आदी तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये मार्चपासून ते पावसाला सुरवात होईपर्यंत विहिरींना पाणी नसते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी मिळणार नसल्याने पाणीपुरवठा कसा होणार? या प्रश्‍नाने ग्रामीण-आदिवासी जनतेच्या मनात रुंजण घातले आहे. (SAKAL Exclusive Water life for village or to feed contractor Question of village administrators nashik news)

जल जीवन मिशनतंर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोचवण्याचे उद्दिष्ट्य केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून देशभर त्याबद्दल गवगवा होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावांत जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. काही गावात काम सुरू होणार आहे. त्या गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना कामांचे अंदाजपत्रक अद्याप पाहावयास मिळालेले नाही.

काही ठिकाणी शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसताना पुढील कामे सुरू आहेत. काही अंदाजपत्रक बनवताना वाढीव बनलेले असल्याचा सरपंचांचा आरोप आहे. याशिवाय जलजीवनची कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आहेत.

वाद अन प्रशासनाच्या गंमती-जमती

सरपंचांना कामांमध्ये विश्‍वास घेतले नाही, अशा तक्रारीमुळे सुरवातीपासून योजना वादाच्या भोवऱ्यात गुरफटल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या गंमती-जमती जिल्हावासिय पाहत आहेत.

कधी सरपंचांचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना दिले जात आहे, मग पुन्हा सरपंचांना अधिकार असल्याच्या कोलांटउड्या अधिकारी मारत आहेत. अशा परिस्थितीत योजना राबवण्यात येणाऱ्या गावांच्या कारभाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थांशी थेट संवाद साधल्यावर जिल्ह्यातील १ हजार २९२ योजना राबवताना गावात जाऊन सूक्ष्म अभ्यास व्हायला हवा, अशी सूचना पुढे आली आहे.

एवढेच नव्हे, तर शाश्‍वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी कामे व्हावीत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाचा शोध घ्यायला हवा. जेणेकरून बारमाही पाणी प्रत्येकाला नळाद्वारे मिळेल, असेही ग्रामस्थ सांगत आहेत.

गावात योजनेचे काम सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेऊन योजनेचे अंदाजपत्रक समजावून सांगावे. योजनेतंर्गत काय कामे होणार आहेत, याची माहिती दिली जावी आणि कामांची जबाबदारी ग्रामसेवकांवर द्यावी. जलस्रोत निश्‍चितीपासून ते नळाद्वारे पाणी घरात येईपर्यंतच्या कामाचे चित्रीकरण ग्रामसेवकांनी करावे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

याशिवाय ठेकेदारांनी ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन कामे करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे देण्यात आली असल्याची माहिती गावांपर्यंत पोचली खरी. पण त्याच्या अंमलबजावणीची मुहूर्त यंत्रणेला कधी मिळणार? असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

"आमच्या गावात जलजीवनचे काम होणार आहे. त्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. पण मला अजून अंदाजपत्रक पाहायला मिळाले नाही. आमच्या गावात आता विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यात पाणी कुठून येणार? म्हणून लाखो रुपये खर्च करताना योग्य विचार व्हायला हवा. आम्हाला वाढीव निधी देऊन वागदर्डी धरणाजवळ विहीर घेऊन पाणी द्यायला हवे." - गोकूळ वाघ, सरपंच, डोणगाव (ता. चांदवड)

"योजना कार्यक्षम आणि प्रभावी ठरण्यासाठी ३३ वर्षे माणसी ५५ लिटर पाणी उपलब्ध आहे की नाही? भविष्यात पुरवठा होईल की नाही? याची खातरजमा कोणीही केली नाही. अगोदर शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून पुढील कामास सुरवात करावी. तोपर्यंत झालेल्या कोणत्याही कामाचे मूल्यांकन व आगाऊ बिल दिले जाऊ नये. एक नवीन विहीर व बोअरवेलच्या कामास सुधारित मंजुरी देण्यात यावी. तोपर्यंत सुरू करण्यात आलेल्या कामास स्थगिती द्यावी."

- पूजा दर्शन अहिरे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत खडकजांब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT