Crime against women esakal
नाशिक

SAKAL Exclusive : वासनांधतेमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात!; 4 महिन्यांत 17 बलात्कार

नरेश हाळणोर

नाशिक : युवक-युवतीमध्ये होणाऱ्या मनमोकळ्या गप्पा, मैत्रीतून फुलत जाणारे प्रेम यांची सीमारेषा कधी कळत तर कधी नकळत ओलांडली जाते. शारीरिक ओढ असणे, ही स्वाभाविक भावना असली तरी त्यावर संयम न राहिल्यास तिचे रूपांतर वासनेत होते आणि नको ते होऊन गुन्हा घडतो.

गेल्या चार महिन्यांमध्ये नाशिक शहरात महिलांवर बलात्कार केल्याचे १७ गुन्हे दाखल झाले आहेत, तर विनयभंगाचे ३८ गुन्हे नोंद झाले. या वाढत्या वासनांधतेमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचीच गंभीर बाब समोर येत असून, सामाजिक दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. (SAKAL Exclusive Women safety in danger due to lust blindness 17 rapes in 4 months nashik Crime News)

नाशिक शहरामध्ये गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंतच्या बलात्कार, विनयभंग, पॉक्सोअन्वये दाखल गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक आहेत. या चार महिन्यांमध्ये नाशिक शहरामध्ये युवती-महिलांवर बळजबरीने बलात्कार केल्याचे १७ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यातही प्रामुख्याने सर्वाधिक नऊ बलात्काराचे गुन्हे अंबड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय, आडगाव, नाशिक रोड, उपनगर आणि गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.

तर, महिलांचे विनयभंग करण्याचे गुन्हेही कमी नसून, आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण ३८ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात पाच, भद्रकाली पोलिस ठाण्यात पाच आणि पंचवटी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे विनयभंगाच्या कलमान्वये दाखल असून, याशिवाय अन्य पोलिस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. काही वासनांधांनी तर लैगिंगकतेची सीमारेषा ओलांडताना चार अल्पवयीन मुलांशी अनैसर्गिक कृत्य केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

स्त्री-पुरुष संबंधांची जवळीक

बदलत्या काळानुरुप समाज बदलतो आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आग्रहीपणामुळे यातील जवळीकही वाढली आहे. परिणामी, कधीकाळी लपून-छपून चालणारे प्रेम प्रकरणे आताचे युवक-युवती खुलेआम करताना दिसतात. मैत्रीपूर्ण संबंधानंतर प्रेम कधी वासनेच्या आहारी जाते, हे अनेकदा कळूनही येत नाही. मात्र, कायद्याच्या चौकटीमध्ये प्रेमाचे पुढचे पाऊल कधी अडकते ते सीमारेषा ओलांडताना अनेकांच्या लक्षातही येत नाही. सुख अन् शारीरिक सुख ही संकल्पनाच संकुचित झाल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो. तरुण वयातील युवक-युवतीवर होत असल्याचा निष्कर्ष मानसोपचारतज्ज्ञांकडून समोर आणला जातो आहे.

बलात्कार : १७

विनयभंग : ३८

पॉक्सोअन्वये बलात्कार : ४

अनैसर्गिक कृत्य : ४

एकूण : ६३

गेल्या चार महिन्यांतील आकडेवारी

महिना ...... बलात्कार ......विनयभंग .....पॉक्सोअन्वये बलात्कार .... अनैसर्गिक कृत्य

जुलै ...........चार.....................नऊ.................एक...................................०

ऑगस्ट ......चार.....................तीन.................दोन...................................दोन

सप्टेंबर.......चार.....................१९................एक..................................दोन

ऑक्टोबर ...पाच....................सात..................०...................................०

एकूण : ....१७...................३८................चार...................................चार

"शारीरिक ओढ निर्माण होणे, ही बाब स्वाभाविक असली तर मनावर नियंत्रण वा संयम असणे गरजेचे आहे. परंतु सभोवतालची परिस्थिती, सोशल मीडिया आणि ओटीटी यांसारख्या माध्यमांतून बोल्डनेसचा विपरीत परिणाम मानसिकतेवर होतो आहे. त्यामुळे समाजामध्ये वासनांधता वाढते आहे. शारीरिक आकर्षण घातक असल्याने त्यातून गुन्हा घडतो आहे, याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. महिलांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आलीच असून, ही बाब सामाजिक चिंता दर्शविणारी आहे." - डॉ. नीलेश जेजुरकर, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT