नाशिक

SAKAL Impact: ‘त्या’ मुलींच्या हस्ते अभ्यासिका फर्निचर कामास प्रारंभ! महापालिकेकडून 17 लाखाचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : प्रभाग ३० मधील शिव कॉलनी येथे आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून बांधलेल्या श्रीसंत रोहिदास महाराज दोन मजली अभ्यासिकेला तब्बल अडीच वर्षानंतर फर्निचरच्या कामाला सुरवात झाल्याने या ठिकाणी सतरंजीवर बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींसह यासाठी पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी समाधान व्यक्त केले. (SAKAL Impact 17 lakh fund approved by Municipal Corporation to sant rohidas maharaj library furniture work nashik news)

सकाळची बातमी

येथे अभ्यास करणाऱ्या श्रावणी गवते, ऐश्वर्या साळुंखे, नीलम, गवते, सलोनी यादव, कोमल जाधव, प्रणाली शिरसाट, वैष्णवी खैरनार, संजना पारवे आदी विद्यार्थिनींच्या हस्तेच फर्निचरच्या कामाला सुरवात करण्यात आली.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या अभ्यासिकेमधील आवश्यक त्या टेबल, खुर्ची आदी फर्निचरसाठी १९ लाख रुपयांचा निधी ॲड. बडोदे यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने अशा मिळकती बांधल्यानंतर वापर नसल्याने तशाच पडून राहतात.

त्यामुळे फर्निचरची गरज नाही असा शेरा मारल्याने काम थांबले होते. मात्र विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये म्हणून ॲड. बडोदे यांनी त्या वेळी स्वखर्चाने सुविधा उपलब्ध करून अभ्यासिका खुली केली होती. खाली सतरंजी टाकून तेव्हापासून या विद्यार्थिनी येथे अभ्यास करत आहेत. या संदर्भात ५ डिसेंबर २०२२ ला ‘सकाळ’ मध्ये शिवकॉलनीतील अभ्यासिकेचे फर्निचर लालफितीत

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर सातत्याने ॲड. बडोदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर या आवश्यक फर्निचरसाठी १७ लाख रुपयांचा निधी महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आला. बुधवारी (ता. ३१) या कामाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी यशवंत जाधव, जयवंत टक्के, राम बडोदे, सुजित मोरे आदी उपस्थित होते.

"परिसरात सर्वसामान्य लोक राहतात. त्यांच्या पाल्यांसाठी ही अभ्यासिका मैलाचा दगड ठरू शकते. त्यासाठी फर्निचरची नितांत गरज होती. देर आए दुरुस्त आए असे म्हणता येईल. काही असो अखेर फर्निचरच काम सुरू झाल्याने समाधानी आहे."

- ॲड. श्याम बडोदे, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT