SSC HSC Board exam  esakal
नाशिक

SAKAL IMPACT : विषय शिक्षकांना सुपरव्हिजन न देण्याच्या मंडळाच्या सूचना; बारावी बोर्डाची यंत्रणा अपडेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : बारावीच्या परीक्षेला सुरवात झालेली असताना पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या विषयाच्या पेपरला इंग्रजी शिकवणाऱ्या प्राध्यापकांना इंग्रजीच्या पेपरलाच सुपरव्हिजन देण्यात आल्यामुळे पारदर्शकतेचा फज्जा उडाला होता. यासंदर्भात ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा जागी झाली.

बोर्डाने या संदर्भात विषय शिक्षक व केंद्रप्रमुखांना पत्र जारी केले असून, विषय शिक्षकांना त्या विषयाच्या पेपरच्या दिवशी सुपरव्हीजन देण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना केली आहे. (SAKAL IMPACT Board instructions not to provide supervision to subject teachers 12th Board System Update nashik news)

ज्या विषयाचे प्राध्यापक अध्यापन करतात, त्या शिक्षकांना पेपरच्या दिवशी सुटी देणे अथवा परीक्षा केंद्राच्या आत येऊ न देणे अपेक्षित असताना पहिल्याच दिवशी बारावीच्या परीक्षेत याउलट घडले.

बोर्डाच्या यंत्रणेने तत्काळ पत्र जारी करत विषय शिक्षकांना त्यांच्या विषयाचा पेपर ज्या दिवशी आहे, त्या दिवशी त्यांना सुपरव्हिजन देण्यात येऊ नये. ज्या शिक्षकांनी सुपरव्हीजन आपल्या विषयाच्या दिवशीच केले, त्याचा अहवाल देण्यात यावा, असे पत्र काढण्यात आले आहे. यामुळे केंद्रप्रमुखांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या संदर्भात केंद्रप्रमुखांनी अपडेट असणे व यथोचित कारवाई करणे अपेक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापुढे कोणीही झुकू शकत नव्हते, त्यामुळे विषय शिक्षकांना त्यांच्याच विषयाच्या दिवशी सुपरव्हीजन देण्यात आले होते.

"सुपरव्हीजनसंदर्भात अहवाल मागविला असून, कार्यपद्धतीमध्ये अपडेशन केले आहे. केंद्रप्रमुखांना त्याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे."

- नितीन उपासनी, अध्यक्ष, नाशिक विभागाय मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात पुढील काही दिवस संकटाचे ! 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Female Doctor Case: पोलिसांचा तपास योग्‍य दिशेने : रूपाली चाकणकर; फलटण उपजिल्‍हा रुग्‍णालयात घटनेची चौकशी

ShivendraRaje Bhosale: केवळ बिल काढण्‍यासाठी नगरसेवक नसावा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे; निवडणुकांत पक्षाच्‍या निर्णयानुसार वाटचाल होणार

Makhana Chocolate Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक मखान्याचे चॉकलेट, सोपी आहे रेसिपी

मोठी बातमी! आता बागायती अन्‌ जिरायती शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीला नसणार गुंठ्यांची मर्यादा; खरेदीवेळी जोडा क्षेत्राच्या चतु:सीमेसाठी गट नकाशा

SCROLL FOR NEXT