ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

SAKAL Impact: बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाले कर्मचारी! महिन्यानंतर CEOकडून आरोग्य सहाय्यकांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : बोलठाण (ता. नांदगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन आरोग्य सहाय्यक मिळाले असून तळेगाव रोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक फिरोज मन्सुरी यांची बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे.

तसे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे. (SAKAL Impact Bolthan Primary Health Center got staff Appointment of health assistants by CEO after month nashik news)

‘सकाळ’ मध्ये १२ मे २०२३ रोजी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला होता

तालुक्यातील ‘घाटमाथ्यावरील आरोग्य व्यवस्था सलाईनवर’ या माथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये १२ मे २०२३ रोजी बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला होता. यात बारा वर्षांपासून रिक्त कंत्राटी कामगारांवरच कामाची भिस्त असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तीची दखल घेत अखेर एक महिन्यानंतर याठिकाणी रिक्त असलेल्या आरोग्य सहाय्यक पदावर श्री. मन्सुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत जातेगाव आणि कासारी हे दोन उपकेंद्र आहे. या आरोग्य केंद्रास एकूण १७ गावे, आणि ९ वाड्या-वस्त्या जोडलेल्या आहे. यासाठी २९ अधिकारी व कर्मचारी यांची पदे मंजूर आहे. मात्र ३६ हजार ४०० इतकी लोकसंख्या असलेल्या या केंद्राची भिस्त ही जादा करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे. मंजूर पदापैकी ५० टक्के पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यात अडचणी येतात.

यातच येथील औषधी निर्माण अधिकारी पद १२ वर्षापासून रिक्त आहे. आरोग्य सहाय्यक पदे दोन त्यापैकी मलेरिया विभाग महाराष्ट्र शासन एक पद मागील १० वर्षांपूर्वी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त आहे. दुसरे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून असलेले दिगंबर जोशी यांची देखील कुठलाही विचार न करता बदली करण्यात आल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. याबाबत ‘घाटमाथ्यावरील आरोग्य व्यवस्था सलाईनवर’ हे वृत्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होत. तब्बल एक महिन्यानंतर तळेगाव रोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक फिरोज मन्सुरी यांना डेपोटेशनवर तात्पुरत्या स्वरूपात बोलठाण येथे बदली करण्यात आली आहे.

------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

Weight Gain Foods: तुमचं वजन वाढवायचंय का? मग आहारात 'या' पदार्थांचा नक्की समावेश करा!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

SCROLL FOR NEXT