sakal-news-impact
sakal-news-impact esakal
नाशिक

SAKAL Impact : पोलिसाला धमकावल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; झडतीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्र हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूरमधील अवैध सावकारीप्रकरणी तपासणीसाठी गेलेल्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यालाच धमकी दिल्याप्रकरणी ‘सकाळ’ने छापलेल्या वृत्ताची दखल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली.

प्ररंभी गुन्हा दाखल करून न घेतलेल्या सातपूर पोलिसांना सूचना दिल्यानंतर बुधवारी (ता. ८) त्या धमकावणाऱ्या सावकाराविरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे सिडकोच्या अभियंतानगरमधील कारवाईत सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळून आल्याने दोघांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

उपनिबंधक कार्यालय व पोलिसांच्या या कारवाईने बेकायदेशीर सावकारांना दणका बसला असून, पुढील दिवसांत ही कारवाई तीव्र होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. (SAKAL Impact case filed in case of threatening police Many incriminating documents seized during search nashik news)

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाचे पथक पोलिसांसह सातपूर परिसरातील सावकाराविरोधात छापामारीसाठी गेले असताना संबंधितानी पोलिस कर्मचाऱ्यालाच धमकी दिली होती. या प्रकाराने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती.

मात्र हा पोलिस संबंधिताविरोधात सातपूर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेला असता त्याला तब्बल तासभर बसवून ठेवण्यात आले आणि नंतर पोलिस आयुक्तांकडे जा, असे सांगण्यात आल्याने पोलिसांनाच न्याय मिळत नसेल तर... अशा प्रतिक्रिया पोलिस वर्तुळातून उमटल्या.

या प्रकऱणाचे वृत्त बुधवारी (ता.८) ‘सकाळ’ने प्रकाशित केले. त्याची पोलिस आयुक्तांनी दखल घेतली. धमकीप्रकरणी बुधवारी सर्व पुरावे पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेत धमकी देणाऱ्या ‘त्या’ सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आता सातपूर पोलिस संबंधित सावकाराविरोधात काय कारवाई करतात, याकडे खुद्द पोलिस आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सिडकोत झडतीत ३८ धनादेश

दुसीरकडे उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी प्रदीप महाजन यांच्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिस ठाण्यात संशयित बेकायदेशीर सावकारी करणारे मोहिनी प्रकाश पवार, राजू शंकर पवार (दोघे रा. भक्तिसागर अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडा, नाशिक) यांच्याविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमन अध्यादेश २०१४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, नाशिक तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून एका पीडित महिलेने जानेवारीत लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत बेकायदेशीर सावकारी करणाऱ्याविरोधात कारवाईसाठी श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.

याच पथकाने ३१ जानेवारीला सकाळी संशयित भक्तिसागर अपार्टमेंटमधील रहिवासी मोहिनी पवार, राजू पवार यांच्या घराची पंचासमक्ष व पोलिस बंदोबस्तात झडती घेतली. या झडतीमध्ये पथकाच्या हाती ३८ व्यक्तींचे धनादेश व आर्थिक व्यवहाराची संबंधित विविध कागदपत्रे मिळाली. २६ व्यक्तीचे आर्थिक व्यवहाराचे हात उसनवार पावत्या व कोरे धनादेशही मिळून आले.

याशिवाय अनेक व्यक्तींचे बँकेचे पासबुकही या झडतीमध्ये पथकाच्या हाती लागले. त्यावरून संशयित पवार बेकायदेशीररीत्या सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अंबड पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

"सिडकोतील कामटवाडा येथील सावकारी प्रकरणात संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीस देण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होईल."

- नईद शेख, पोलिस उपनिरीक्षक, तपासी अधिकारी, अंबड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT