selling nylon manja will punished Commissioner of Police issued an injunction esakal
नाशिक

SAKAL Impact: खबरदार...नायलॉन मांजा विकाल तर तडीपार व्हाल! पोलीस आयुक्तांनी जारी केला मनाई आदेश

जीवाला घातक असलेला नायलॉन मांजाची शहरात पुन्हा सर्रासपणे विक्री होते आहे...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीवाला घातक असलेला नायलॉन मांजाची शहरात पुन्हा सर्रासपणे विक्री होते आहे. गेल्या आठवड्यात सिडकोमध्ये एक दुचाकीस्वार युवक जखमी झाल्याचीही घटना घडली होती.

अखेर याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा वापराविरोधात मनाई आदेश जारी करतानाच, नायलॉन मांजा निर्मिती, साठ्यासह विक्रेत्या व वापरकर्त्यांना थेट तडीपार करण्यात येणार आहे. (SAKAL Impact sell nylon manja will punished Commissioner of Police issued an injunction nashik)

मकर संक्रांतीनिमित्ताने शहरात पतंग उडविले जातात. परंतु त्यासाठी साधा मांजा न वापरता गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजा वापरला जातो. परंतु या मांजामुळे जीवाला धोका उत्पन्न होऊन गंभीर स्वरुपाच्या दुखापती यापूर्वी झालेल्या आहेत.

दरवर्षी नायलॉन मांजामुळे गंभीर अपघाती घटना घडलेल्या आहेत. २०२० मध्ये भद्रकाली परिसरात मांजामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय मुक्या पशुपक्ष्यांनाही यापासून धोका उत्पन्न होत असतो.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात येत्या २३ जानेवारीपर्यंत मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात पतंगबाजीतही वाढ होणार आहे.

त्यामुळे या काळात कोणतीही जीवितहानी वा गंभीर दुखापतीच्या घटना घडू नये, त्या वेळीच रोखता याव्यात यासाठी आयुक्तांनी सदरचा मनाई आदेश जारी केला आहे. तसेच पोलीस ठाणेनिहाय नायलॉन मांजाविरोधात कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.

तसेच, कोणत्याही हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दुखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारीचीही कारवाई केली जाईल, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सिडकोत मांजा जप्त

सिडको परिसरातील भगतसिंग चौकात नायलॉन मांजा विक्री करण्यास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले.

विराज संजय लोणारी (२३, रा. सिडको) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ‘मोनो’ नावाच्या मांजाचे १४ हजार रुपयांचे ३५ ‘गट्टू’ जप्त केले आहेत.

त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT