The entire Maratha community on a fast on Wednesday near the statue of Chhatrapati Shivaji near the central bus stand. esakal
नाशिक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तत्काळ अधिवेशन घ्या! सकल मराठा समाज

मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन घेण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली.

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी (ता. १४) जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद तसेच लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन घेण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली. (sakal maratha samaj statement of Take immediate reservation for Maratha reservation nashik news)

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असताना राज्य सरकार कुठलेही पाऊल उचलत नाही. मुख्यमंत्री त्यावर एक शब्दही बोलत नाहीत. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदवून मागण्या मान्य करून उपोषण सोडवले नाही, तर राज्यात उद्रेक होईल व त्याला राज्य सरकारच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

करण गायकर, नानासाहेब बच्छाव, चंद्रकांत बनकर, नितीन रोटे-पाटील, ज्ञानेश्वर कवडे, योगेश नाटकर, राजेंद्र शेळके, विकी गायधनी, वैभव दळवी, संदीप फडोळ, नितीन पाटील, कृष्णा धोंडगे, भारत पिंगळे, चेतन शेलार, रेखा पाटील, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, ॲड. स्वप्ना राऊत, सविता वाघ, दीपाली लोखंडे, योगिता पाटील.

रोहिणी उखाडे, मंगेश पाटील, अजय काळे, सुधाकर चांदवडे, सागर वाबळे, हर्शल पवार, रमेश खापरे, हिरामण वाघ, नितीन खैरनार, मंगेश पाटील, अण्णासाहेब खाडे, अमोल शिंदे, संदीप हांडगे, राम निकम, संदीप खुटे, सागर फडोळ, शोभा सोनवणे, स्वाती कदम, शिवाजी धोंडगे, जगदीश शेजवळ, सुरेश निकम, संपत टोपे आदी उपस्थित होते.

''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, तर उद्यापासून एकही खासदार, आमदार, मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. जरांगे-पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्राची परिस्थिती बिघडेल. सरकारने तातडीने अधिवेशन घेऊन हा प्रश्न सोडवावा.''- करण गायकर, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT