During the 'Sakaal-Samvad' program, while welcoming the Provident Fund (PF) Commissioner of Nashik Area, Anil Kumar Pritam, editor of the Uttar Maharashtra edition of 'Saakaal'. Rahul Ranalkar. esaka
नाशिक

SAKAL Samvad | वेतनधारकांनी ई- नॉमिनेशन भरत टाळावेत वाद : आयुक्‍त अनिल कुमार प्रीतम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीच्‍या काळात मोठ्या प्रमाणावर जीवहानी झाल्‍यानंतर मृतांच्‍या वारसामध्ये भविष्यनिर्वाह निधी व निवृत्तिवेतन (पेन्‍शन)च्‍या दाव्‍यावरून वाद उद्‍भवलेले आहेत. अनेक घटनांमध्ये वाद न्‍यायालयापर्यंतदेखील गेलेले आहेत.

आपल्‍या वारसांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्‍येक वेतनधारकाने ‘ई-नॉमिनेशन’ची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्‍या (ईपीएफओ) नाशिक विभागाचे आयुक्‍त अनिल कुमार प्रीतम यांनी केले. (SAKAL Samvad Commissioner Anil Kumar Pritam statement Wage earners should avoid e nomination Bharat nashik news)

‘सकाळ’च्‍या सातपूर कार्यालयात झालेल्‍या ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते म्‍हणाले, की एखादा वेतनधारक त्‍यांच्‍या भविष्यनिर्वाह निधीचा हिस्सा एक किंवा एकापेक्षा जास्‍त वारसांमध्ये त्‍याला हव्‍या त्‍या प्रमाणात वितरित करू शकतो.

त्‍यासाठी ‘ई-नॉमिनेशन’ प्रक्रियेतून वारसाचा तपशील व त्‍यास अदा करावयाच्‍या हिश्‍याचे प्रमाण नोंदविले पाहिजे. वेतनधारक कितीही वेळा या रचनेत बदल करून वारसांचे नाव दाखल किंवा काढू शकतो.

सोबत त्‍यांच्‍या दाव्‍याचे प्रमाण कमी, अधिक करू शकतो. त्यामुळे किमान एकदा तरी ई-नॉमिनेशन भरून वारसांची नोंद करण्याचे आवाहन त्‍यांनी केले. यामुळे भविष्यातील संभाव्‍य वाद टळून, वारसांना वेळीच आर्थिक मदत मिळविण्यासाठी सहाय्यता होईल.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पीएफ काढणे झाले सोयीचे

आयुक्‍त अनिल कुमार प्रीतम म्‍हणाले, की भविष्यनिर्वाह निधी प्राप्त करून घेण्याच्‍या नियमावलीत सुधारणा करण्यात आल्‍या आहेत. यामुळे वेतनधारकांना निधीतील जमा रक्‍कम प्राप्त करून घेताना प्रतिज्ञापत्र (डिक्‍लरेशन) द्यावे लागणार नाही.

आधार-बँक सीड असल्‍यास अर्ज केल्‍याच्‍या २० दिवसांच्‍या आत रक्‍कम अदा केली जाऊ शकते. घराचे बांधकाम करण्यासाठी एक वेळा, घराची देखभाल दुरुस्‍तीकरिता पाच वर्षांनंतर एक वेळा रक्‍कम काढता येऊ शकते.

पाल्‍याचा शिक्षणासाठी किंवा लग्‍नसमारंभासाठी तीन वेळा भविष्यनिर्वाह निधीतून रक्‍कम काढता येऊ शकते. आजारपणाकरिता कितीही वेळा रक्‍कम काढता येऊ शकते. प्रत्येक वेळी पगाराच्या सहापट किवा कर्मचाऱ्यांच्या हिश्श्‍याच्या जमा रक्कमेएवढी रक्कम काढता येऊ शकते.

‘प्रयास’च्‍या माध्यमातून निवृत्तीच्‍या दिवशी पेन्‍शन

‘प्रयास’या महत्त्‍वाकांक्षी योजनेच्‍या माध्यमातून निवृत्तीच्‍या दिवशी वेतनधारकाला निवृत्तिवेतन (पेन्‍शन) अदा करण्याचा कार्यालयाचा प्रयत्‍न आहे. नियोक्‍त्‍याकडून सर्व बाबींची पूर्तता करून घेताना निवृत्त कर्मचाऱ्यांची संभाव्‍य दमछाक टाळली जाते आहे.

निवृत्तिवेतन प्राप्त करून घेण्यासाठी स्‍टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्‍सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांच्‍या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोचविली जाते आहे.

विम्‍याचा होतोय कर्मचाऱ्यांना लाभ

ईपीएफओ कार्यालयामार्फत पीएफ, पेन्‍शन यांसह विम्‍याची योजना उपलब्‍ध आहे. वेतनधारकाच्‍या निधनानंतर वारसांना पात्रतेनुसार जास्तीत जास्त सात लाखांपर्यंतची विमा रक्‍कम अदा केली जाते आहे. त्‍यासाठी संबंधित व्यक्‍तीचा मृत्यू सेवेत असताना होणे अनिवार्य आहे, असेही आयुक्‍त या वेळी म्‍हणाले.

लाभार्थ्यांच्‍या संख्येत सातत्‍याने वाढ

नाशिक विभागांतर्गत सध्या चार लाख ६० हजार वेतनधारकांकडून भविष्यनिर्वाह निधी खात्‍यात योगदान दिले जाते आहे. जुलै २०२१ पासून आयुक्‍तपदाची जबाबदारी सांभाळल्‍यापासून सुमारे तीस हजारांनी वाढ केलेली असल्‍याचे आयुक्‍त अनिल कुमार प्रीतम यांनी सांगितले.

यात प्रामुख्याने मनरेगा, महापालिका, नगर परिषदांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत लाभ पोचविण्यात आल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Akola News : अकोट मध्ये ‘एमआयएम’ कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून जितेन बरेठिया; भाजप नेत्याच्या पुत्राच्या सहभागाने पुन्हा राजकीय भूकंप!

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना 'फ्लेक्सबाजी' करण्यास सक्त मनाई; शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पक्षाचे कडक आदेश!

Pune Crime : विश्रांतवाडी बस थांब्यावर पुणे पोलिसांची सापळा रचून कारवाई; कुख्यात गुंड अरबाज शेख अटक!

Supriya Sule : "पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असणार"- खासदार सुप्रिया सुळे!

SCROLL FOR NEXT