Baipan Bhari Deva esakal
नाशिक

SAKAL Special: चालता-बोलता !

सकाळ वृत्तसेवा

बालपण भारी देवा...

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने महिलांना अक्षरश: वेड लावले. प्रत्येक घरातील महिलेने स्वत:मधील एका स्त्रीचे प्रतिबिंब या चित्रपटातील महिलांच्या भूमिकेत बघितले. पण त्याहीपेक्षा भारी बालपण असते.

बालवयातून किशोर वयात जाताना येणारे अनुभवही दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्याचे असे झाले, एका माध्यमिक शाळेतील सर्वाधिक उंच असलेल्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त वर्गातील विद्यार्थिनी एक गाणे तयार करतात.

हा विद्यार्थी वर्गात प्रवेश करताच त्या सामुहिकपणे गायला सुरुवात करतात, ‘गोरी गोरी पानऽऽऽ दादा मला एक वहिनी आण...वाढदिवस राहिला बाजूला पण दादाचा चेहराच आनंदाने लालबुंद झाला नसेल तरच नवल...(SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire drama nashik)

आम्ही तुम्हाला पाहयचं की नाटक?

राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाचे सादरीकरण सुरू होते. नाटकाचा विषय अन् सादरीकरण उत्तम चाललेलं असल्याने प्रेक्षकही त्यात तल्लीन झाले होते.

या नाटकाच्या संघाला बहुदा त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ठेवायचे असेल म्हणून कॅमेरामन पद्धतशीरपणे मध्यभागी आपला कॅमेरा लावून उभे होते.

आता त्यांच्या मध्येच उभ राहण्याने प्रेक्षकांना रंगमंच काही दिसेना. शेवटी दर्दी रसिक बोललेच, अहो आम्ही तुम्हाला पाहीच की नाटकाला.. चला बाजूला व्हा... हे ऐकून तोही ओशाळला आणि बाजूला झाला.

एका राजकारणाची एक्झिट...

नगरसेवक असताना विटलेल्या एका राजकारणी व्यक्तीने महापालिकेच्या सभागृहातच निवृत्तीची घोषणा केली. राजकारणातून निवृत्ती घेत असताना आमदारकीची निवडणुक देखील लढली, परंतू एका बड्या नेत्याच्या हितचिंतक अधिकाऱ्याने तांत्रिक कारणे देत आमदारकीतून बाद ठरविले.

त्यानंतरही जिद्दीला पेटलेल्या त्या नेत्याने पक्ष बदलून दुसरी आमदारकीची निवडणुक लढविली, परंतू यावेळी कोर्टात जाता आले नाही. त्याला कारण म्हणजे फरक इतका होता कि, कुठल्याही न्यायालयात दावा फेटाळला गेला असता.

पण राजकारणाची ओढ स्वस्थ बसू देईना. संघटनेच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा तसेच आपल्यामागे समाज मोठ्या प्रमाणात असल्याचे दाखवत राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला.

सध्या ज्या पक्षात स्थैर्य आहे, त्याच पक्षाच्या नेत्याने यांच्या निमंत्रणाऐवजी अन्य एकाच्या घरी भोजन घेतल्याने राजकारणाची उरली...सुरली आशा संपुष्टात आली. ‘गड्या आपल्या धंद्याचा गाव बरा’ म्हणतं सध्या तरी या नेत्याने राजकारणातून एक्झिट घेतली.

...अन साहेबांनी डोक्याला हात लावला

शासकीय कामकाजावरून ‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ अशी म्हणच प्रचलित आहे. मात्र, काही शासकीय कार्यालयातील अधिकारी तत्काळ कामांचा निपटारा करत असतात. पेन्डसी त्यांना आवडत नाही.

सामान्य काम घेऊन आले, की त्यांची कामे मार्गी लावतात. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात एक कर्मचारी नेता आला होता.

त्यांचा एका कर्मचारी पदोन्नतीचा प्रश्न होता. विभागातील अधिकारींनी लागलीच यादी बघत, संबंधित कर्मचाऱ्यास पदोन्नती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर नेत्याने ‘बघा.. ना साहेब काही करा.

एवढं काम झाले पाहिजे’ अशी साद घातली. मात्र, शासकीय नियमाने चालणा-या अधिकाऱ्याने पदोन्नती होऊ शकणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर, नेता बाहेर पडला, त्यापाठोपाठ लागलीच अधिकारीही देखील कामानिमित्त बाहेर पडले.

संबंधित नेता बाहेर असलेल्या शिष्टमंडळाला साहेबांनी दोन महिन्यात काम करणार असल्याचे सांगत होता. त्यावेळी पाठीमागे असलेले अधिकारी ते बोलणे ऐकत होते. हे ऐकून त्या अधिकाऱ्याने डोक्याला हात लावला अन लागलीच गाडी काढून निघून जाणे पसंत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT