Nana Patekar esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता

सकाळ वृत्तसेवा

एक मच्छर आदमी को...

नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटात ‘एक मच्छर आदमी को... बनाता है’ हा डॉयलॉग आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. हा डॉयलॉग सर्वच पिढीत बोलला जातो. परंतु बोलताना तारतम्य पाळले नाही की पंचायत होते.

अशाच प्रकारची पंचायत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची झाली. एका सायंकाळी कार्यक्रमानिमित्त गेला असता तेथे डोक्यावर डासांचे थवे घोंगावत होते. थवे हटकताना आपसूकच टाळ्यादेखील वाजत होत्या.

या टाळ्या अनेकदा अन् जोरात वाजल्या. टाळ्यांचा आवाज इतका दूर गेला, की गर्दीतील लहान मुलाने ‘एक मच्छर आदमी को.... बनाता है’ असे वाक्य उच्चारताच गर्दीत हशा पिकला.

या हशाने राजकीय कार्यकर्त्यांचा तीळपापड झाला. परंतु त्या वेळी लहान मुलाला बोलणार काय, असा विचार करता राग आतल्या आत गिळून घ्यावा लागला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy satire political nashik news)

पाटलांचा पाय जमिनीवरच टेकेना

राज्यात सध्या दोनच व्यक्तींच्या नावाची चर्चा आहे. एक म्हणजे मनोज जरांगे आणि दुसरे त्यांना नडणारे. दोघांच्याही सभांना तुंबळ गर्दी असते. एकाचे वजन अवघे ३५ किलो, तर दुसऱ्याच्या भुजांमध्ये बळ आले आहे.

झाले असे, की नाशिकमध्ये आल्यानंतर जरांगे-पाटलांचे जोरात स्वागत झाले. एका कार्यकर्त्याने तर त्यांना थेट खांद्यावरच उचलून घेतले. आता खाली उतरवायचे म्हटले तरी गडी काही ऐकायला तयार होईना.

शेवटी जरांगे-पाटलांनी उडी मारल्यावर हा पठ्ठ्या थांबला. सभा संपल्यावर पाटलांनी थेट माइकवरुनच सांगून टाकले, की मला जायला सरळ रस्ता दिला, तरच मी येथून जाईल.

नाही तर आपल्या गावातच मुक्काम करतो. पण ऐकतील ते कार्यकर्ते कसले. त्यांनी पुन्हा पाटलांना घेराव घातला आणि असे उचलले, की पाटलांचा पायच जमिनीवर टेकला नाही.

सांगायचे पश्चिमेला, जायचे पूर्वेला

शासकीय कार्यालयात जनसेवेची कामे करणे हे अधिकारी, विभागप्रमुखांचे कर्तव्य असते. मात्र, काही अधिकारी केलेल्या कामाचा गवगवा करण्यात आघाडीवर असतात. तर काही बोलण्यात माहीर असतात.

मिनी मंत्रालयात प्रशासनाची धुरा सांभाळणारे प्रमुख अधिकारी नाव परदेशी असले, तरी देशी असलेले अगदी कामाचे. कोणत्याही कामात चोखपणा, दिलेली जबाबदारी पार पडण्यातही त्यांचा कोणीही हात धरणार नाही.

रोज त्यांच्याकडे भेटायला जाणाऱ्या अभ्यागंताचा मोठा गोतवळा असतो. त्यांनी विचारलेल्या माहितीला थेट उत्तर न देता अनावश्यक माहितीचे सादरीकरण करत विषयाला बगल देतात. झाले असे, की त्यांच्यावर परीक्षांची मोठी जबाबदारी असल्याने कामाचा मोठा ताण आहे.

या परिस्थितीत पत्रकारांचा जत्था त्यांच्याकडे गेला. नेहमीप्रमाणे पत्रकारांकडून प्रश्नांचा भडिमार झाला. मात्र, प्रमुख प्रश्न सोडून अवांतर विषयांवर गप्पा झोडत वेळ मारून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली.

माइकवाला शोधा

एका शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू होती. मात्र कार्यक्रमाची मदार ज्यावर असते, तो सूत्रसंचालक काही निश्चित होत नव्हता. अधिकाऱ्यांमध्ये अनेकांच्या नावांवर चर्चा झाली. एकाचे नाव घेतले की, तो खूपच बोलतो.

दुसऱ्याचे नाव घेतले, की त्याच्या हातात माइकच देऊ नका. तिसऱ्याचे नाव घेतले, की त्याच्या हाती माइक गेला तर त्याला भानच राहत नाही... अशा एक ना अनेक कारणांनी अनेकांच्या नावांवर फुली मारली गेली.

पण माईकवाला निश्चित होत नव्हता. अखेर एका अधिकाऱ्यास मागील एका कार्यक्रमात सूत्रसंचालक करणारा कर्मचारी आठवला. पण त्याला शोधायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला.

अधिकारीच म्हटल्यावर, त्यांच्या आदेशानुसार यंत्रणा कामाला लागली आणि अखेर तो माइकवाला सापडला. त्याला कार्यक्रमाची माहिती देत मोजक्या आणि आटोपशीरपणे माइक हाताळण्याचे समुपदेशनच एकप्रकारे देण्यात आले.

भाऊ, त्याला इच्छाशक्ती लागते...

नाशिक शहरातील मुंबई नाका सर्कल हा सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीने गजबजलेलाच असतो. काम आटोपून घराकडे निघालेले दोन दुचाकीस्वार अशाच वाहतूक कोंडीत अडकले अन् एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करीत पहिला दुचाकीस्वार म्हणाला, ‘शिट् यार रोजचं झालंय.

नेमकं घरी जायच्या वेळेला हा डोक्याला ताण होतोय. ही किटकिट मिटवायला या सर्कलचा आकार कमी करणार आहेत म्हणे; पण आज किती दिवस झाले अजून थंडपणाने काम सुरूय.’ त्यावर दुसरा दुचाकीस्वार उत्तरला, ‘भाऊ, त्याला इच्छाशक्ती लागते.

मोठमोठी कामं आठवडाभरात होतात आणि हे एवढंसं काम किती आठवडे चालणार हे त्यांनाच माहीत’ असं म्हणत दोघेही वाहतूक कोंडीतून वाट काढत घराकडे निघाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT