winter health update esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता !

सध्या हवामानात सतत बदल होत आहे. सकाळी गुलाबी थंडी असली, तरी दुपारी मात्र घामाच्या धारा निघतात.

सकाळ वृत्तसेवा

साऱ्या ‘झेडपी’ला सर्दी झालीय..!

सध्या हवामानात सतत बदल होत आहे. सकाळी गुलाबी थंडी असली, तरी दुपारी मात्र घामाच्या धारा निघतात. शेअर मार्केटसारखा चढ-उतार अनुभवणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाने लोक फणफणू लागले आहेत.

त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले, की अधिकारी-कर्मचारी आजारी असल्याचे सर्रासपणे कारण पुढे केले जाते. ...तर झाले असे, की जिल्हा परिषदेतही बदलत्या हवामानाचा फटका अनेकांना बसला आहे. सर्दी, खोकल्याने ते बेजार झाले. जिल्हा परिषदेची धुरा सांभाळत असलेले प्रमुख आजाराने बेजार आहेत.

अशा परिस्थितीत कामकाजाची जबाबदारी सहाय्यकांवर आली. यातच एका बैठकीदरम्यान प्रमुखांना भोवईही आली. मात्र, त्यानंतर काही वेळात प्रमुखांनी कामकाजाला सुरवात केली. एक विभागप्रमुख आजारी असल्याने कार्यालयातून लवकर गेले.

त्याबाबत अन्य विभागातील कर्मचाऱ्याने विचारले असता, विभागातील कर्मचाऱ्याने ‘साहेब आजारी झाले आहेत, ते लवकर गेले,’ असे सांगितले. त्यावर ‘सर्वच आजारी झाले आहेत वाटतं. प्रमुखांच्या सर्दीची लागण अनेकांना झाली की काय, साऱ्या ‘झेडपी’लाच सर्दी झाली की काय,’ अशी मिश्‍किल टिप्पणी त्या कर्मचाऱ्याने केली. (SAKAL Special chalta bolta nashik political satire crime comedy tragedy news)

मी गोव्याहून आलो, अन्‌ थंडी कमी झाली

वातावरणात कधी थंडी जाणवते; तर कधी गारवा गायब होत असल्‍याचा अनुभव सध्या नाशिककरांना येतोय. त्‍यामुळे हवामानाचा नेमका ठाव घेणे मुश्‍कील बनले आहे. दोन-चार दिवसांपूर्वी गार वाऱ्यामुळे थंडावा असताना, गुरुवारपासून तुलनेत थंडी घटली आहे. एका धार्मिक सोहळ्यादरम्‍यान वातावरणाच्‍या या चमत्‍कारावर चर्चा सुरू होती.

इतक्‍यात एक ज्‍येष्ठ तेथे दाखल झाले अन्‌ चर्चेत सहभाग नोंदविला. आपण गोव्‍याला फिरून आल्‍याचं त्‍यांना खरं तर उपस्‍थितांना सांगायचं होतं. त्‍यांनी त्‍यासाठी अनोखी शक्‍कल लढविली. घटलेल्‍या थंडीची चिकित्‍सा करताना ते म्‍हणाले, ‘काय आहे ना, मी गोव्‍याहून कालच परत आलो. म्‍हणून नाशिकची थंडी कमी झाली आहे वाटतं.’

काकांचं हे वाक्‍य ऐकताच उपस्‍थितांमध्ये हशा पिकला. अन्‌ वातावरणातील बदलाचा सुरू असलेला विषय हळूच सरकून गोव्‍याची टूर कशी झाली, कुठे-कुठे फिरले यावर पोहोचला. पण, काही क्षणांसाठी हा विनोद खुदकन हसविणारा ठरला.

मार्फेन म्हणजे काय रे भो..?

नाशिकमध्ये सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबरचा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर आता या व्हिडिओवर नाशिकमध्ये चर्चांचे फड रंगू लागले आहेत. बडगुजर यांच्या विरोधकांच्या कुरघोडीनंतर आता बडगुजर समर्थकांकडूनही विरोधकांचे पार्टी व समजेल त्या जागेवरचे व्हिडिओ तपासण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे.

बडगुजर यांनी व्हिडिओ मार्फेन केल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला; तर यापूर्वी एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांचे नाव घेताना त्यांच्या मुलाचे ललित पाटील याच्याबरोबरचे फोटो व्हायरल केले होते. पांडे यांनीही ते फोटो मार्फेन केल्याचा दावा केला होता. मार्फेन हा सोशल मीडियातील नवा प्रकार समोर येत असल्याने प्रत्येकाकडून मार्फेन समजून घेतले जात आहे.

त्याचबरोबर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा हाही नवीन प्रकार मार्केटमध्ये आला असून, या हुबेहूब आवाजासह फोटो लावून व्हिडिओ तयार करता येत असल्याने भीतीने का होईना, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची वेळ समाजात वावरणाऱ्यांवर येऊन पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Electricity Issue : हिंजवडीवर वीजसंकट; केबल दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी

'मी देहदान केलं आहे!' 'ठरलं तर मग'च्या सायलीने सांगितली आतली गोष्ट, म्हणाली, 'जेवढं आपण दान करू शकतो ते....'

Latest Maharashtra News Updates : : शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तीन कोटी

Latur Education: अकरावीसाठी पहिल्या फेरीत ३२ हजार ७७० विद्यार्थ्यांचा प्रवेश; आता दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

"त्यानंतर मला ताप अन् वाचा गेली" ठरलं तर मग फेम अभिनेत्याने सांगितला तो भयंकर प्रसंग ; "थिएटरने.."

SCROLL FOR NEXT