Uddhav Thackeray esakal
नाशिक

SAKAL Special : चालता...बोलता...! उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष घेतला हाती..

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचे (उबाठा) राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष घेतला हाती..!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेचे (उबाठा) राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. मेळाव्याच्या या मुहूर्ताने उद्धव ठाकरे आधीच चर्चेत आले होते.

कारण याच मुहूर्तावर राज ठाकरेंनी देखील दोन वर्षांपूर्वी आपल्या पक्षाचे अधिवेशन घेत राजकीय भूमिका अन् पक्षाचा ध्वज बदलला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हाती काय घेणार, याचे अनेकांना कुतूहल होते.

आघाडीत असल्याने अर्थातच उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत भाजपविरोधी भूमिका घेतली. मात्र त्यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिर, गोदाआरतीप्रसंगी गळ्यात व अधिवेशन अन् जाहीर सभेदरम्यान उजव्या हाताच्या मनगटावर रुद्राक्ष माळ धारण केली होती.

यामुळे ठाकरेंच्या भूमिकेबाबत कुतूहल असणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष घेतला हाती, हे उत्तर मिळाले. (SAKAL Special chalta bolta political satire uddhav thackeray group shivsena convention jahir sabha eknath shinde nashik news)

साहेबांपुढे कोण बोलणार

घरातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवणे, ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते. तसेच कुटुंबातील सदस्याचा गौरव झाला तर प्रमुखही आनंदीत होतात. असाच काहीसा प्रकार एका उच्चशिक्षित घरात घडला. मतदार नोंदणीत नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला म्हणून नाशिकच्या अधिकाऱ्यांचा गौरव होणार आहे.

तसेच नंदुरबार जिल्ह्याचाही सन्मान होत आहे. या दोन्ही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती प्रमुख अधिकारी म्हणून काम बघतात. त्यामुळे दोघांचा सन्मान होणे, हा योगायोग असला तरी एकाच कुटुंबातील दोन्ही व्यक्तींचा गौरव होणे, ही अभिमानास्पद बाब आहे.

हीच गोष्ट हेरून काही व्यक्तींनी साहेबांसोबत ‘मॅडम’चे ही अभिनंदन केले. तुमचा निरोप मॅडमपर्यंत पोहोचवतो म्हणून साहेबांनी वेळ मारून नेली. पण पार्टीचे नाव काही काढले नाही म्हणून कर्मचारी बिचारे नाराज झाले. पण साहेबांपुढे कोण बोलणार, तुम्हीच सांगा...

मेळावा ‘उबाठा’ गटाचा, शिंदे सेनेचे झेंडे

अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्‍घाटन, शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे राज्यव्यापी अधिवेशन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती या तीनही कार्यक्रमांमुळे नाशिक शहर भगवेमय झाले आहे. रस्त्यावर, गल्लोगल्ली झेंड व बॅनर युद्ध रंगले आहे.

शिवसेनेचे महाअधिवेशन त्र्यंबक रस्त्यावर असल्याने व याच रस्त्यावर मायको सर्कलवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यालय असल्याने एक वेगळाच माहोल तयार झाला आहे. ‘उबाठा’ गट व शिंदे गट या दोन्हींची चिन्ह, झेंडा व पक्षासाठी न्यायालयात लढाई सुरू आहे.

चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. परंतु भगवा झेंडा अद्यापही दोन्ही पक्षांकडे आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी मायको सर्कल येथे ‘उबाठा’ सेनेने लावलेल्या झेंड्यांच्या मधोमध शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह असलेले कटआउट लावल्याने झेंडे उबाठा गटाने नव्हे, तर शिंदे गटानेच लावल्याचेच निदर्शनास येत असल्याने एवढ्या पुरते का होईना शिंदे गटाने मारलेली बाजी चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT