Application Writing esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता

सकाळ वृत्तसेवा

सुटी घेतली नाही; पण पुरावा हवा ना!

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचा अर्ज भरून सुटी घेणारे विद्यार्थी तुम्ही कधी पाहिले आहेत का? अशी एक शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांकडून सुटीचा अर्ज लिहून घेतला जातो. या शाळेतील कार्तिक नावाच्या विद्यार्थ्याला सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी वणी गडावर जायचे होते.

त्यासाठी त्याने सुटीचा अर्ज भरून दिला. पण, गडावर जाणे काही झाले नाही. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला. सुटी घेतलेली असताना शाळेत का आला म्हणून वर्गशिक्षिका त्याला विचारतात; तर मित्रांनी मला ‘टप्पा’ दिला म्हणून मी शाळेत आल्याचे तो सांगतो.

पण, एवढ्यावरच तो थांबत नाही, तर मॅडमकडून सुटीचा अर्ज परत मागतो. आता या अर्जाचे करणार काय म्हणून मॅडम त्याला विचारतात.

तर हा पठ्ठ्या म्हणतो, ‘तुम्ही हजेरी पटावर माझी सुटी दाखवली तर माझ्याकडे पुरावा हवा की नाही?’ त्याचे हे उत्तर ऐकून मॅडमांनी डोक्याला हात लावला, हा भविष्यात नक्कीच वकील होणार, असा आशीर्वाद देत त्यांनी तो सुटीचा अर्ज परत केला. आता बोला! (SAKAL Special chalta bolta tragedy comedy political satire nashik news)

अनवट वाटेवरील वाटसरू

आयुष्यातील सर्वच दिवस एकसारखे नसतात. ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने त्याप्रमाणे लोक वागतात. सृष्टीचा बदल स्वीकारून पुढे चालत राहतात.

एवढे सगळे तत्त्वज्ञान सांगण्यामागे एकच कारण आहे अन् ते म्हणजे, ज्या मोर्चेकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी पोलिस अहोरात्र प्रयत्न करत होते त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या गाडीत घेऊन आले.

मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत यशस्वी चर्चा केली. मग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला. तिथेच पोलिसांचे काम संपले. आपल्या गाडीत आलेल्या मोर्चेकऱ्यांना त्यांच्या साथीदारांपर्यंत सोडविण्याचा त्रासही करून घेतला नाही.

शेवटी गाडीची वाट बघण्यापेक्षा आपण चालत जाऊ, असे म्हणत शेतकऱ्यांनी परतीचा मार्ग निवडला. अगदी आयुष्याच्या अनवट वाटेवरून निघालेल्या वाटसरूंसारखे...

पुरस्काराची लई भारी हौस

सामाजिक क्षेत्रात काम करताना काही जणांना केलेल्या कामांचा गवगवा करण्याचा अन् त्या माध्यमातून विविध पुरस्कार मिळण्याची मोठी हौस असते. त्यासाठी काही लोक देखावा करतात. यात अनेकदा न केलेली कामे दाखवून पुरस्कार पटकविले जातात.

सामाजिक क्षेत्रातील हाच कित्ता आता शासकीय कार्यालयातील अधिकारी गिरवू लागले आहे. झाले असे, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासकीय राज सुरू आहेत. यातील मिनी मंत्रालयात एक वरिष्ठ अधिकारी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत, स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत या अधिकाऱ्यांने आपल्या उपक्रमाचा गवगवा केला आहे. यातून शासन पातळीवरचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.

यातच एका मोठ्या संस्थेचा पुरस्कारासाठी प्रस्ताव बनविण्याचे काम या अधिकाऱ्याचे सुरू असून, त्यासाठी राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण योजनेचा रिझल्ट आलेला नसताना तो दाखविला जात आहे.

त्यावर कर्मचारीवर्ग त्रस्त झाला आहे. यातील एका कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्यास पुरस्काराची लई भारी हौस आहे, शासनाचे काम करत आहात की पुरस्कारासाठी काम करता हेच कळत नाही, असा उपरोधिक टोला हाणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT